Home /News /lifestyle /

हँगओव्हर उतरवण्याच्या नादात गेला जीव; खतरनाक प्रयोगामुळे बड्या माजी अधिकाऱ्याचा मृत्यू

हँगओव्हर उतरवण्याच्या नादात गेला जीव; खतरनाक प्रयोगामुळे बड्या माजी अधिकाऱ्याचा मृत्यू

हँगओव्हर उतरवण्यासाठी या अधिकाऱ्याने विचित्र उपचार घेतले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा दावा केला जातो आहे.

    मॉस्को, 11 मे : हँगओव्हर उतरवण्यासाठी लोक काय काय नाही करत. पण एका अब्जाधीश बड्या अधिकाऱ्याने हँगओव्हर उतरवण्यासाठी स्वतःवर असा प्रयोग केला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. नको त्या पद्धतीने हँगओव्हर उतरवण्याच्या नादात त्याचा जीव गेला आहे. हँगओव्हर उतरवण्यासाठी या व्यक्तीने स्वतःवर विषप्रयोग करवून घेतला, असा दावा केला जातो आहे (Man died after Toad poison treatment to cure a hangover). रशियातील अलेक्झांडर सुब्बोटिन यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.. अलेक्झांडर हे रशियातील अब्जाधीश आणि देशातील सर्वात मोठी तेल कंपनी लुकोईलचे माजी अधिकारी होते. रशियाच्या ऊर्जा महामंडळ लुकोईलच्या बोर्डाचे ते सदस्य होते. मॉस्कोतील मितिश्चीमधील एका ठिकाणी बेसमेंटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूचं कारणही धक्कादायक आहे. हे वाचा - ऑगस्टमध्ये अचानक 20 लाख लोक होणार गायब! Time traveller चा खळबळजनक दावा द सनच्या रिपोर्टनुसार सुब्बोटिन यांचा मृत्यू टोड पॉयझनिंग म्हणजे बेडकाच्या विषामुळे झाल्याचं म्हटलं आहे. बेडकाच्या विषाचा उपयोग करून ते हँगओव्हरचा उपचार करत होते, असा दावा टेलिग्राम चॅनल मॅशने केला आहे. चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार  सुब्बोटिन मितिश्चीमधील एका जादूगाराकडे गेले होते. सुब्बोटिन त्याला बऱ्याच कालावधीपासून ओळखत होते आणि त्याची सेवाही घेत होते. असंच एकदा हँगओव्हरचा उपचार करण्यासाठी ते त्याच्याकडे गेले. त्यांच्या त्वचेवर एक छेद करण्यात आला आणि तिथं बेडकाचं विष लावण्यात आलं. यानंतर कथितरित्या ते ठिक झाल्याचा दावा करण्यात आला. हे वाचा - समुद्रकिनारी सेल्फी घेणं भोवलं; मोठी लाट येताच पाण्यासोबत वाहून गेले पर्यटक, VIDEO पण तिथं त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या हृदयात वेदना होऊ लागल्या. जादूगाराने अॅम्ब्युलन्सलाही बोलावलं नाही. तिथंच बेसमेंटमध्ये त्यांना झोपवलं आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला. लुकोईलचे माजी उपाध्यक्ष म्हणाले की, सुब्बोटिन आणि आपण फक्त मित्र होतो, असं जादूगराने पोलिसांनी सांगितलं
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Russia, World news

    पुढील बातम्या