Sperm Count वाढवण्यासाठी या गोष्टी खा, फर्टिलिटी होईल चांगली

शरीरात फॉलिक असिडची कमतरता असल्यास कमकूवत शुक्राणूंची संख्या वाढण्याचा धोका असतो. यामुळे स्पर्मना अंडाशयापर्यंत पोहचण्यात अनेक अडचणी होतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 10:56 PM IST

Sperm Count वाढवण्यासाठी या गोष्टी खा, फर्टिलिटी होईल चांगली

Super Foods That Increase Sperm Count: सध्याच्या धकाधकीच्या जीवनाचा समतोल राखण्यासाठी अनेकदा लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अनियमित खाणं आणि झोप याचा आरोग्यावर सर्वाधिक वाईट परिणाम होतो. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होणं ही समस्याही वाढत चालली आहे. स्पर्मची गुणवत्ता योग्य नसल्यामुळे गर्भधारणेवर (फर्टिलिटी) त्याचा परिणाम होतो. एका सुदृढ पुरुषामध्ये सेकंदाला 1 हजार 500 स्पर्म तयार होतात. पुढील काही उपायांनी पुरुष त्यांच्या स्पर्म काउंट आणि क्वॉलिटीमध्ये वाढ करू शकतात.

मेरी सहेली पत्रिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जस्त (zinc) स्पर्म काउंट वाढवण्याचा उत्तम स्त्रोत आहे. ऑयस्टर अर्थात कालव्यात (शिंपल्यांचा एक प्रकार) भरपूर प्रमाणात जस्तचे तत्त्व असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्म तयार होतात. त्यामुळे ज्यांना स्पर्म काउंटची कमतरता आहे त्यांनी नियमितपणे 50 ग्रॅम कालवे खावे. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

पालवकमधील फॉलिक असिड हे निरोगी शुक्राणूच्या उत्पादनाचं काम करतात. शरीरात फॉलिक असिडची कमतरता असल्यास कमकूवत शुक्राणूंची संख्या वाढण्याचा धोका असतो. यामुळे स्पर्मना अंडाशयापर्यंत पोहचण्यात अनेक अडचणी निर्माण होतात.

डार्क चॉकलेटमुळे स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. डार्क चॉकलेटमध्ये अमिनो एसिड, अँटीऑक्सिडंट असतात. हे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी करणारा घटकाला दूर करतं. असं असलं तरी डार्क चॉकलेट अती खाणंही चांगलं नाही, यामुळे वजन वाढतं. यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या संतुलनात बिघाड होऊ शकतो. याचा परिणाम म्हणून स्पर्म काउंट कमी होतो.

लसूणमध्ये एलिसिन असतं. हे पुरुषांच्या सेक्शुअल ऑर्गनमध्ये रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतं. स्पर्मचं नुकसान होण्यापासून लसूण वाचवतं. लसूणमध्ये सेलेनियम असतं जे शुक्राणूंचा वेग वाढवतो. रोज दोन लसणाच्या पाकळ्या खाणं उत्तम.

Loading...

डाएटमध्ये अक्रोड खाणंही चांगलं. यात असलेल्या ओमेगा 3 फॅटी असिड हे पुरुषांच्या सेक्शुअल ऑर्गनमध्ये रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करतं. रोज एक मूठ अक्रोड खाल्याने स्पर्मची संख्या आणि गुणवत्ता वाढायला मदत मिळते.

टॉमेटो खाल्ल्यानेही स्पर्म काउंट वाढतो. टॉमेटोमध्ये असलेले लाइकोपिन स्पर्म काउंट, क्वॉलिटी आणि स्ट्रक्चर चांगलं करतं. टॉमेटोला ऑलिव्ह ऑइलमध्ये उकडून खाल्ले तर त्याचा अधिक चांगला फायदा होतो. याशिवाय केळ्यात ब्रोमेलिन अंजाइम, विटामिन सी, ए आणि बी1 असतं. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती होतो. तसेच हे सेक्स हार्मोनल नियंत्रीत करण्यातही मदत करते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आता सिगारेट न ओढणाऱ्यांना मिळणार अतिरिक्त 6 सुट्ट्या

यामुळे आजही देशात इतर राज्यांपेक्षा जम्मू- काश्मीर आहे सर्वोत्तम

Swiggy वर लोक सर्वाधिक हा पदार्थ करतात ऑर्डर

कमी खर्चात अशा प्रकारे सजवू शकता तुमचं स्वप्नातलं घर 

सांगलीत गर्भवती महिलेचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 10:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...