मुंबई, 13 मार्च : हल्लीच्या धावपळीच्या जगात अनेकांना डिप्रेशननं ग्रासलंय. आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा कळतही नाही तणावांमुळे आपल्याला त्रास होतोय. यामुळेच अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. डिप्रेशन हे मेंदूत झालेल्या बदलांमुळे येतं. त्यामुळेच आपण ताणावाची शिकार होतो.
आपल्या मेंदूत पांढरा भाग असतो. त्यात फायबर असतं. हे मेंदूतल्या पेशींना एकमेकांना जोडतं. या पांढर्या भागामुळे आपल्याला भावनांची जाणीव होते. आपण विचार करू शकतो. डिप्रेशन असलेल्या व्यक्तींना झोप येत नाही, जीव घाबराघुबरा होतो, तणाव जाणवतो.
या आजारावर डाॅक्टर गोळ्याही देतात. पण निसर्गानंच डिप्रेशनवर औषधं तयार केलीयत. त्यानं खूपच फायदा होतो. जाणून घेऊ अशाच काही नैसर्गिक औषधांबद्दल
यात पहिलं नाव येतं ते अश्वगंधाचं. ही वनस्पती तुमचा स्ट्रेस कमी करते. यातल्या अॅक्टिव कंपाउंड्समध्ये अँटी-डिप्रेसेंट असतं. दुसरं औषध आहे ब्रह्मी. यामुळे स्ट्रेसशी लढण्याची ताकद मिळते. ब्रह्मीमुळे तुम्ही शांत होता.
याशिवाय जटामासी औषधाचाही वापर करा. यात अँटी-डिप्रेसेंट, अँटी - स्ट्रेस आणि अँटी-फटीग असे गुणधर्म असतात. जटामासीमुळे तुमचा मूड स्विंग होत असेल तर तो सुधारतो. मनातला ताण कमी होतो.
पुदिनाही औषधी आहे. पुदिना नियमित खाल्ल्यानं तुम्ही डिप्रेशनपासून वाचता. पुदिना खाल्ल्यानं मेंदू शांत रहातो आणि शरीरही थंड राहतं.
तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो. तुम्ही दु:खी आहात याची जाणीवही तुम्हाला होत नाही. तेव्हा समजा तुम्हाला डिप्रेशन आहे. मित्रमैत्रिणींपासून दूर राहणं, स्वत:ला एकटं समजणंही डिप्रेशन असू शकतं. डिप्रेशन असलेल्या व्यक्तीला आयुष्यात काय करायचंय, याचं उत्तर सापडत नाही. ती व्यक्ती फोकस नसते.
बाॅयफ्रेंडबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेण्याआधी मुली घेतात 'इतका' वेळ