या टीप्सने तुम्ही झटपट फेडू शकता कर्ज, एकदा वाचून पाहा

आपली अशी अनेक स्वप्न असतात जी कर्ज घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 10:24 AM IST

या टीप्सने तुम्ही झटपट फेडू शकता कर्ज, एकदा वाचून पाहा

आपली अशी अनेक स्वप्न असतात जी कर्ज घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ घर, गाडी अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावी लागतात. काही वेळी आर्थिक तंगीमुळे वेळेवर कर्ज फेडणंही जमत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा अवघड परस्थितीत नेमकं काय करायचं याच्या काही टिप्स देणार आहोत.

कर्ज घेतलेल्या व्यक्तीने तीन ईएमआय जर वेळेवर भरले नाहीत तर आधी बँक नोटीस पाठवते. तुम्ही त्या नोटीशीचं उत्तर दिलं नाही तर बँक नंतर कायदेशीर नोटीस पाठवते. असं करुनदेखील तुमचं काहीच उत्तर आलं नाही तर, बँक तुम्हाला डिफॉल्टर कॅटेगिरीमध्ये टाकते. त्यानंतर बँक तुम्हाला आणखी दोन नोटीस पाठवते. त्याचंही उत्तर दिलं नाही तर मात्र बँक तुमच्या मालमत्तेचा लीलाव करू शकते.

बँकेने तुमची मालमत्ता लिलावात काढली तर तुमचा क्रेडिट स्कोअऱ खराब होतोच. शिवाय भविष्यात कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही.

जर तुम्हाला गृहकर्ज वेळेवर भरण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराशी बोलू शकता. असं केल्याने तुमच्या समस्येवर वेळीच उपाय मिळू शकतो.

तुमचं कर्ज लवकर फेडण्यासाठी तुमच्याकडे पार्शल पेमेंट हादेखील एक पर्याय आहे. या पर्यायाचा वापर केल्यास तुम्ही दिलेल्या वेळेपेक्षा लवकर कर्ज फेडून मोकळं होऊ शकता.

Loading...

पार्शली पेमेंट म्हणजे बोनस स्वरूपात मिळालेली रक्कम, एरियस, शेअर बाजारात झालेला नफा, मित्र- परिवाराकडून बक्षीस स्वरूपात मिळालेली रक्कम अशा अनेक मार्गातून जमा झालेल्या रक्कमेतून तुम्ही वेळे आधी कर्ज फेडू शकता.

एखाद्या बँकेचं व्याजदर तुम्हाला जास्त वाटत असेल आणि ती बँक व्याजदर कमी करत नसेल तर तुम्ही बँक बदलून दुसऱ्या बँकेकडे तुमचं कर्ज ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्हाला कुठलीही रक्कम मोजावी लागणार नाही. पण या पर्यायाचा सारखा वापर करु नका.

जर तुम्ही सेव्हिंगमधून ईएमआयची रक्कम परतफेड करू शकत असाल तर तुमी वेळेआधीच कर्ज फेडू शकतात. तुम्ही प्रत्येक महिन्याला जास्त रक्कम देली तर तुमचं कर्ज लवकर फेडलं जाऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...