मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

साइझ तर योग्य आहे तरी फिट बसत नाहीये; कशी ओळखायची तुमच्यासाठी Perfect Bra

साइझ तर योग्य आहे तरी फिट बसत नाहीये; कशी ओळखायची तुमच्यासाठी Perfect Bra

ब्रा (BRA) खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला परफेक्ट ब्रा मिळेल.

ब्रा (BRA) खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला परफेक्ट ब्रा मिळेल.

ब्रा (BRA) खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला परफेक्ट ब्रा मिळेल.

मुंबई, 25 नोव्हेंबर : आपलं व्यक्तिमत्त्व उठावदार असावं आणि आपण कॉन्फिडंट दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी बोलणं, चालणं, देहबोली तर महत्त्वाची असतेच; पण सोबतच तुमचा लूक, तुमचे कपडे हेही खूप महत्त्वाचं असतं. महिलांच्या बाबतीत बोलायचं तर फक्त आउटफिटच चांगलं असणं पुरेसं नाही, तर अंडरगार्मेंट्स विशेषत: परफेक्ट ब्रा (Correct size of bra) घालणं अत्यंत महत्त्वाचं असतं. योग्य ब्रामुळे तुमचं व्यक्तिमत्त्वही अधिक खुलून दिसतं. तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी इतर काही गोष्टी जशा करता, तितकंच योग्य ब्रा निवडणंही आवश्यक आहे. नाहीतर त्याचा लूकवरच नाही तर आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

बऱ्याच महिलांना आपल्यासाठी कोणती ब्रा परफेक्ट आहे हे माहिती नसतं. त्यामुळे त्या चुकीच्या ब्रा (Bra Size) घालतात. तुमच्यासाठी कोणती ब्रा योग्य आहे हे जाणून घेण्याआधी योग्य ब्रा घालण्याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहुयात.

योग्य मापाची ब्रा घातल्याचे फायदे (Benefits of Wearing Correct bra size)

- आरामदायी वाटेल : योग्य मापाची ब्रा घातली (Correct size of bra) तर त्यामुळे तुम्हाला खूप आरामदायी वाटेल. तुम्हाला अस्वस्थ वाटणार नाही. त्यामुळे अर्थातच तुम्ही तुमचं कामही अधिक चांगलं करू शकाल.

- आत्मविश्वास वाढेल : महिलांबाबत केलेल्या अभ्यासातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या महिला ब्रा घालतात, त्यांना चांगला आत्मविश्वास असतो. ब्रा घातल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत नाही. त्यासाठीच ब्रा योग्य मापाच्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही या सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. अर्थात ही प्रत्येकीच्या आवडीनुसार करावयाची आणि खासगी गोष्ट आहे.

- स्तनांना सपोर्ट (आधार) मिळतो : ब्रा घातल्यामुळे स्तनांना आधार मिळतो. त्यामुळे स्तनांची त्वचा सैल पडत नाही.

- बॉडी पोश्चर योग्य राहतं : योग्य ब्रा घातल्यानं बॉडी पोश्चरही योग्य राहते. तुमचं बॉडी पोश्चर खराब असेल तर आरोग्यविषयक काही समस्या उद्भवतात. त्या योग्य ब्रामुळे निर्माण होत नाहीत.

आता परफेक्ट ब्रा म्हणजे नेमकी कशी? (How to know correct Size of Bra)

- ब्रा बँड म्हणजेच ब्राची हूक लावण्याची पट्टी किंवा बेल्ट पूर्ण आणि योग्य तऱ्हेने लागत असेल आणि तुमच्या पाठीवर बरोबर मध्यभागी येत असेल, तर तुमची ब्रा योग्य मापाची असल्याचं ते एक लक्षण असतं.

- तुम्ही हात वर केलात तर हा बँड वर जाऊ नये.

- ब्रा स्ट्रॅप आणि खांद्यामध्ये एका बोटाचं अंतर असावं.

- ब्रा तुमच्या स्तनांना (ब्रेस्टला) पूर्णपणे झाकणारी असावी.

ब्रा साइझ कसा मोजावा? (How to Measure Bra Size)

- सहसा ब्रा 28, 30, 32, 34 या साइझमध्ये मिळतात. हा साइझ म्हणजे ब्रेस्टच्या खाली असलेल्या जागेचा म्हणजेच हाडाचा आकार असतो. यालाच बँड साइझ (Band Size) असं म्हणतात. A, B, C, D हे ब्रेस्ट साइझ (Breast Size) असतात. यालाच कप साइझ (Cup Size) असंही म्हटलं जातं. तुमचा ब्रेस्ट साइझ माहिती करून घ्यायचा असेल तर टेपनं ब्रेस्टचं माप घ्या आणि जो नंबर येईल त्यात एक मिळवा. विषम संख्या आली तर त्यापुढचा सम नंबर हा तुमचा बँड साइझ असतो. म्हणजे तुमचा नंबर 31 आला तर तुमचा बँड साइझ 32 असतो.

हे वाचा - ब्रा आणि पँटीवर का असतो 'रिबन बो? जाणून घ्या त्यामागील खरं कारण

- टेपनं तुमच्या ब्रेस्टच्या पुढे आलेल्या भागाचं माप घ्या. कप साइझ जाणून घ्यायचा असेल तर ब्रेस्ट साइझ आणि बँड साइझ हे दोन्ही वेगवेगळं ठेवा. म्हणजे ब्रेस्ट साइझ 31 आहे आणि बँड साइझ 30 आहे, तर दोन्हींमधला फरक 1 इंच आहे. म्हणजेच तुमचा कप साइझ A आहे. अगदी याच पद्धतीनं दोन्हींमधला फरक 2 इंच असेल तर कप साइझ B, फरक 3 इंच असेल तर कप साइझ C आणि हा फरक 4 इंच असेल तर कप साइझ D असेल. दर सहा महिन्यांनी तुमचा साइझ आवर्जून तपासा.

ब्रा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा (Bra Shopping/Purchasing Tips)

- ब्रा चांगल्या ब्रँडची/कंपनीची घ्या.

- ब्रा चांगल्या क्वालिटीचीच घ्या. (Bra Quality)

- सिथेंटिक फॅब्रिकच्या ब्रा घेऊ नका.

- ब्रा विकत घेण्यापूर्वी ती ट्रायल रूममध्ये ट्राय नक्की करून बघा.

- ब्रा बँडच्या (Bra band) शेवटपर्यंत हूक लावून ब्रा (Hook) व्यवस्थित आहे ना ते चेक करा. हा हूक व्यवस्थित लागला तर ब्रा सैल झाली तरी तुम्ही ती घालू शकाल

- ब्राचे कप जास्त बाहेर आलेले नाहीत ना हे नक्की तपासा.

- ब्रा जास्त घट्ट नसावी आणि ती घातल्यावर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ नये.

- ब्राच्या स्ट्रॅपमुळे (Bra Strap) तुमच्या त्वचेला त्रास होऊ नये.

- ब्रा बँड आणि स्ट्रॅपमध्ये दोन बोटं जाऊ शकली इतकी जागा असावी.

- ब्रा घालून बघताना वाकून बघा. जर स्तन ब्रा मधून बाहेर येत असतील तर याचा अर्थ ती ब्रा तुमच्यासाठी योग्य मापाची नाही.

- तुमच्या मापाची आणि योग्य क्वालिटीची ब्रा घेण्यासाठी तुम्ही तज्ज्ञाचीही मदत घेऊ शकता.

हे वाचा - फॅशन म्हणून नव्हे, आरोग्यासाठी योग्य अंडरगार्मेंट्स हवीत; अंतर्वस्त्रांची कशी काळजी घ्याल? डॉक्टरांचा सल्ला ऐका

एकूणच, बाहेरून दिसत नसली तरी ब्रामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि सुडौल दिसतं. त्यामुळे विचार करून मगच तुमच्यासाठी योग्य आकाराचीच ब्रा विकत घ्या.

First published:

Tags: Lifestyle, Woman