मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Pregnancy Tips : प्रेग्नन्सीसोबत ऑफिस वर्क सांभाळणं होईल सोपं, फॉलो करा या टिप्स

Pregnancy Tips : प्रेग्नन्सीसोबत ऑफिस वर्क सांभाळणं होईल सोपं, फॉलो करा या टिप्स

गर्भधारणेदरम्यान काम करणे अधिक कठिण आणि संघर्षमय होऊ शकते. त्यामुळे या स्थितीत काम सोपं व्हावं आणि शरीरही निरोगी थकव्यापासून दूर राहावे यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.

गर्भधारणेदरम्यान काम करणे अधिक कठिण आणि संघर्षमय होऊ शकते. त्यामुळे या स्थितीत काम सोपं व्हावं आणि शरीरही निरोगी थकव्यापासून दूर राहावे यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.

गर्भधारणेदरम्यान काम करणे अधिक कठिण आणि संघर्षमय होऊ शकते. त्यामुळे या स्थितीत काम सोपं व्हावं आणि शरीरही निरोगी थकव्यापासून दूर राहावे यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : स्त्रियांवर घर आणि ऑफिस या दोन्ही पातळीवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असतो. अशा परिस्थितीत शरीर सुदृढ असेल तरी काम केल्यानंतर मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो. गर्भधारणेदरम्यान तर काम करणे अधिक कठिण आणि संघर्षमय होऊ शकते. अशा परिस्थितीत गर्भधारणा झाल्यास तुमचा तुमच्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळे या स्थितीत काम सोपं व्हावं आणि शरीरही निरोगी थकव्यापासून दूर राहावे यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.

गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रियांचे शरीर संवेदनशील बनते. या परिस्थितीत योग्य पोषण, पुरेशी झोप आणि व्यायामाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक असते. सामान्य आणि निरोगी गर्भधारणेच्या स्थितीत प्रसूती वेदाना होईपर्यंत काम करणे चांगले मानले जाते. येथे आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्या गर्भवती महिलांना कामाच्या ठिकाणीही निरोगी जीवनशैली राखण्यास मदत करतील.

Pregnancy Tips : सुरक्षित आणि सोपी प्रेग्नन्सी हवीय? मग आतापासूनच करा हे काम

मोह आवरा : गर्भधारणेआधी ऑफिसमध्ये तुमची रोज दोन वेळा किंवा मनभरुन कॉफी पिण्याची सवय आणि कॅफेटेरियामधील अन्नपदार्थांच्या सुंगधामुळे गर्भधारणेच्या स्थितीत तुमचे पोट खरबळू शकते आणि तुम्हाला त्याचा स्वाद घेण्याचा मोह होऊ शकतो. परंतु या स्थितीत तुमच्या शरीरासाठी हानिकारण असलेली प्रत्येक गोष्ट टाळा.

स्नॅक्स जवळ बाळगा : गर्भधारणेदरम्यान तुम्हाला आजारी वाटत असेल तर क्रॅकर्स आणि साधे स्नॅक्स तुमच्या कामी येऊ शकतात. असे स्नॅक्स कामाच्या ठिकाणी तुमच्या जवळ ठेवा. याशिवाय आल्याचा चहा देखील तुमच्यासाठी फादेशीर ठरू शकतो.

आयर्न आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या : थकवा आणि अशक्तपणा हे लोहाच्या कमतरतेचे लक्षण आहे. तुम्ही आहारात बदल करून त्यावर मात करू शकता. याशिवाय तुम्ही लाल मांस, चिकण, मासे, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि बीन्स खाऊ शकता हे प्रोटिनसाठी चांगले पर्याय आहेत.

नियमित, संक्षिप्त विराम घ्या : कामादरम्यान थोडा वेळ उभे राहणे आणि काही मिनिटे चालण्यामुळे तुम्हाला अधिक उत्साही वाटण्यास मदत होईल. याशिवाय काही क्षण डोळे मिटने आणि पाय वर उचलण्यामुळे देखईल तुम्हाला बरे वाटण्यास मदत होऊ शकते.

भरपूर द्रवपदार्थांचे घ्या : तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा डेस्कवर पाण्याची बाटली भरून ठेवा आणि त्यातून दिवसभर हळू हळू पाणी पित राहा. याशिवाय आहारात भरपूर द्रवपदार्थांचा समावेश करा.

अॅक्टिव्हिटी कमी करा : दिवसभरातील अॅक्टिव्हिटी कमी केल्यास तुम्हाला दिवसाअखेर विश्रांती मिळण्यास मदत होऊ शकते. यासाठी तुमची खरेदी इंटरनेटवरून करण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या घराची देखभाल करण्यासाठी किंवा तुमच्या अंगणाची काळजी घेण्यासाठी एखाद्याला कामावर ठेवा.

Laughing Benefits : गरोदरपणात हसल्याने बाळाला होतात 'हे' फायदे, आईही राहाते निरोगी

फिटनेस रूटीन सुरू ठेवा : गर्भधारणेदरम्यान थोडा व्यायाम केल्याने तुमची उर्जा पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. विशेषतः तुम्ही दिवसभर खुर्चीवर बसून काम करत असाल तर याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या डॉक्टरने परवानगी दिल्यास तुम्ही कामानंतर फेरफटका मारण्यासाठी जाऊ शकता किंवा प्रसूतीपूर्व व्यायाम वर्गातही जाऊ शकता.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy