Home /News /lifestyle /

Shoes Trouble : बूट चावतोय?; चप्पल-बुटांमुळे पायांना त्रास होत असेल तर करून पाहा या ट्रिक्स

Shoes Trouble : बूट चावतोय?; चप्पल-बुटांमुळे पायांना त्रास होत असेल तर करून पाहा या ट्रिक्स

चांगल्या दर्जाचे बूट सहसा पायांना त्रास देत नाहीत. पण काही जणांची त्वचा सेन्सिटिव्ह असते. त्यांना हमखास बूट लागतो. (Shoe bite) चप्पल चावते. अशा वेळी काय करायचं?

    दिल्ली, 15 सप्टेंबर : काही जणांना बूट घालायला फार आवडतात. काहींना ते युनिफॉर्म किंवा ऑफिस वेअर म्हणून आवश्यकही असतं. त्यासाठी महागडे आणि आपल्याला आवडीचे बूट विकत घेतले जातात. चांगल्या चामड्याचे किंवा चांगल्या दर्जाचे बूट सहसा पायांना त्रास देत नाहीत. पण काही जणांची त्वचा सेन्सिटिव्ह असते. त्यांना हमखास बूट लागतो. चप्पल चावते. अशा वेळी काय करायचं? ज्या लोकांना बूट घालायला आवडतात, परंतु ते घालताना आणि वापरताना (Tips to Make Shoes) त्याचा त्रास होत त्यांनी काही गोष्टी पाळणं आवश्य आहे. नवीन घेतलेले बूट वापरताना ते तुमच्या पायांची अथवा बोटांची कातडी (Excitement Skin) काढत असतील तर या पद्धतीच्या बुटांसाठी कॉटन बॅंड-एडचा वापर करायचा. त्यामुळे बाहेर जाताना आपल्या पायातील बुटांच्या आत कॉटन बॅंड-एड लावा. विशेषत: ज्या ठिकाणी पायांची त्वचा सोलून निघत आहे, अशा जागी त्याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पायांचं आणि त्वचेचं रक्षण होईल. त्याचबरोबर अनेकदा नवीन बूट हे आपल्या पायाला फिट्टं बसतात. त्यामुळेही त्रास होते. त्यामुळे आपल्या साइझचे योग्य बूट विकत घेणं गरजेचं असतं. केळीच्या पानावर जेवण का करावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे नवीन घेतलेले बुट हे आपल्याला अनेकदा फिट होतात. त्यामुळे आपल्या पायाच्या त्वचेला त्याचा त्रास व्हायला लागतो. त्यासाठी पेपरचा केलेला रोल उपयोगी पडतो. त्यासाठी सर्वात आधी पेपरचा एक मोठा रोल तयार करायला हवा, त्यानंतर त्या रोलला बुटांमध्ये फिट्ट वसवा, ज्यामुळे बुटांचा आकार वाढेल, जेव्हा आपल्याला बुट घालायचे असेल तेव्हा तो रोल काढून घ्या आणि बुटाचा वापर करा. नवीन बुटांमुळे आपल्या पायांच्या घोट्याला याचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी आपण सॅनिटरी पॅडचा वापर प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे त्यातून घाम आणि पायांतील त्रासांमुळे सुटका होऊ शकते. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health Tips, Skin, Skin care, Tips

    पुढील बातम्या