कमी खर्चात अशा प्रकारे सजवू शकता तुमचं स्वप्नातलं घर

कमी खर्चात अशा प्रकारे सजवू शकता तुमचं स्वप्नातलं घर

फार कमी लोकांना माहीत आहे की उशाही घराला विशेष लुक देतात. सध्या बाजारात अनेक पारंपरिक डिझाइनसह वेगवेगळ्या आकाराच्या उशा मिळतात.

  • Share this:

Tips To Decorate Home In Low Budget: घर कसं दिसतं यावरून त्या घरातील लोक कसे असतील याचा अंदाज बांधता येतो. घराच्या सजावटीवरून तुमचे विचार आणि राहणीमान याचा अंदाज बांधता येतो. स्वच्छ टापटीप घर आणि अस्वच्छ घर याच्यातला फरक आणि तिथलं वातावरण पटकन कोणाच्याही लक्षात येतं. पण अनेकदा जेव्हा घराला नवीन लुक द्यायची वेळ येते तेव्हा घरातील प्रत्येकाची मतं वेगळी असतात. बाजारात असलेल्या अनेक पर्यांयांमुळे नक्की घर कशापद्धतीने सजवायचं या संभ्रमान अनेकजण असतात. आज आम्ही तुम्हाला घर सजवण्याचे काही सोपे आणि खिशाला परवडतील असे उपाय सांगणार आहोत.

जर तुम्हाला घर प्राचीन वस्तूंनी सजवून घराला ऐतिहासिक आणि भव्य लुक देता येऊ शकतो. धातूंनी बनवलेल्या गोष्टींचा वापर जर सजावटीसाठी केला तर घर अधिक सुंदर दिसेल. याशिवाय रंगांवरही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

फार कमी लोकांना माहीत आहे की उशाही घराला विशेष लुक देतात. सध्या बाजारात अनेक पारंपरिक डिझाइनसह वेगवेगळ्या आकाराच्या उशा मिळतात. यांचा वापर करून तुम्ही तुमची लिव्हिंग रूम आणि बेडरूम सजवू शकता. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं पहिलं लक्ष उशांकडे जाईल यात काही शंका नाही.

याशिवाय तुम्हाला तुमचं घर बोल्ड आणि ब्राइट रंगांनी सजवायचं असेल तर निळ्या रंगाचा वापर नक्की करू शकता. निळा रंग हा डोळ्यांना थंडावा देतो, त्यामुळे या रंगाचा वापर तुम्ही बेडरूमच्या भिंतींसाठी नक्कीच करू शकता.

प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात स्वतःच्या घरासाठी विशेष स्थान असतं. घरात केलेल्या छोट्या छोट्या बदलांमुळे तुमच्या घराला नवीन लुक मिळू शकतो. या छोट्या बदलांसाठी फार खर्चही करावा लागत नाही. याशिवाय दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी घरासाठी विकत घ्या.

मुलांच्या खोलीत जास्तीत जास्त साफ- सफाई होईल याकडे लक्ष द्या. मुलांची खोली जास्तीत जास्त कलरफुल असेल याचीही काळजी घ्या. यामुळे मुलांना त्यांच्या खोलीत रहायला आवडेल. तसेच मुलांना ज्या कलेची आवड आहे त्याच्याशी निगडीत गोष्टींचा सजावटीमध्ये समावेश करा. मुलांच्या खोलीतील भिंतींवर कार्टुनचे वॉलपेपर लावू शकता. तसेच त्यांच्या खोलीत एक अशी जागा निश्चित करा जिकडे ते स्वतःची खेळणी ठेवतील. यामुळे खोलीत फार पसारा होणार नाही.

पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं टाळाच!

Feng Shui: घरात ठेवा या गोष्टी, कधीच होणार नाही पैशांची कमतरता!

बालपणीच्या मैत्रिणीला जीवनसाथी करण्याचे हे आहेत फायदे

सांगलीत गर्भवती महिलेचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन, पाहा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 8, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading