नवी दिल्ली, 04 जानेवारी : ओमिक्रॉनचे रुग्ण देशभरात वेगाने वाढत आहेत. हे टाळण्यासाठी आपण पूर्णपणे लसीकरण केलं पाहिजे आणि आपली प्रतिकारशक्ती टिकून राहणं आवश्यक आहे. कोविड-19 च्या या सर्वात संसर्गजन्य प्रकारापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपल्या शरीराची आधीच तयारी करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओमिक्रॉनपासून संरक्षण करण्यासाठी, आपल्याला जीवनशैली सुधारण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, पूर्ण झोप, उत्तम आणि सकस आहार, कसरती इ. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यात टी-सेल्सचा (T-cell) मोठा वाटा असतो. ते आपल्या शरीराचं विषाणू आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आणि आपल्याला सुरक्षित करण्यासाठी कार्य करतात. हे आपल्या शरीराचे कोविड-19 विरुद्ध प्रतिपिंडांपेक्षा अधिक प्रभावीपणे संरक्षण करतं. जाणून घ्या, वेलनेस एक्सपर्ट आणि लाइफ कोच ल्यूक कौटिन्हो यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे. ओमिक्रॉनविरुद्ध आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काही सोपे मार्ग त्यांनी सांगितलेत. या सोप्या टिप्स आपल्या टी-सेल्स मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. आपल्या शरीरातील टी-सेल्स मजबूत करून आपण प्रतिकारशक्ती कशी मजबूत करू (Tips To Boost Immunity) शकतो, ते जाणून घेऊ.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे सोपे उपाय
1. व्हिटॅमिन डी घेणं आवश्यक आहे
व्हिटॅमिन डी आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक घटक आहे. तेव्हा आजच तुमची व्हिटॅमिन डी पातळी तपासा. जर ही पातळी खाली आली असेल तर, ती वाढवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी जितक्या लवकर वाढेल, तितक्या लवकर तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्ही सुरक्षित राहाल.
2. चांगली झोप आवश्यक
संशोधनात हे देखील सिद्ध झालंय की, कमी झोप घेतल्यानं तुमची प्रतिकारशक्ती प्रभावित होते. शरीरात जळजळ वाढते आणि आपल्याला संक्रमण आणि विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच चांगली झोप खूप महत्त्वाची आहे.
3. आवश्यक व्यायाम
तुम्ही खूप कठीण किंवा मोठ्या प्रमाणात व्यायाम करणं आवश्यक नाही. तसंच, व्यायामशाळेत जाऊनच व्यायाम करणंही आवश्यक नाही. तुम्ही सक्रिय राहणं आणि तुमच्या जीवनशैलीत योग्य ते बदल करणं, चालणं, योगासनं आदी महत्त्वाचं आहे.
4. व्हिटॅमिन सी आणि झिंक आवश्यक
तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी रोजच्या आहारात लसूण, आले, गरम मसाला, हळद, मध, तुळस, रंगीबेरंगी शिमला मिरची, आवळा इत्यादींचा समावेश करावा. शक्यतोवर, प्रत्येक रंगाचे अन्न तुमच्या फूड प्लेटमध्ये समाविष्ट करा.
हे वाचा - SBI ग्राहकांना झटका! 1 फेब्रुवारीपासून महागणार ही सेवा, द्यावे लागणार 20 रुपये + GST
5. प्राणायाम आवश्यक
शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी प्राणायाम करावे. तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि धरून ठेवा आणि नंतर श्वास सोडताना फुफ्फुस पूर्णपणे रिकामे करा. त्यासोबतच ध्यान करा, खूप हसा.
6. स्वतःला हायड्रेटेड ठेवा
चहा किंवा कॉफी प्यायल्याने अनेकांना आपण हायड्रेटेड आहोत, असे वाटते. मात्र, ही पेय डिहायड्रेट करण्याचे काम करतात. त्यामुळे भरपूर पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी, घरी काढलेला रस इत्यादी प्या.
7. जंक फूडपासून लांबच राहा
शक्यतो रिफाइंड शुगर, मैदा, जंक फूड, फ्रोजेन फूड खाणे टाळा. फळे आणि रंगीबेरंगी भाज्यांचा आहारात समावेश करा.
हे वाचा - 22 कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड, दोन व्यापाऱ्यांना अटक, ठाणे सीजीएसटीची कारवाई
8. धुम्रपान नकोच
तुम्ही धुम्रपान करत असाल तर त्यामुळे टी पेशी कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने खालावत जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus