सलाड बनवणंही आहे एक कला... चुकीची पद्धत पडू शकते महागात

सलाड बनवणंही आहे एक कला... चुकीची पद्धत पडू शकते महागात

वजन कमी करण्यासाठी तुम्ही सलाड खात असाल, मात्र ते योग्य पद्धतीने बनवलं नाही, तर तुमचं वजन कमी होण्याऐवजी अधिकच वाढेल.

  • Share this:

कोणी सलाड खाताना दिसलं की, 'काय रे डाएटवर आहेस का?', असा प्रश्न विचारला जातो... सलाडचा संबंध वजन कमी करण्याशी जोडला जातो.  मात्र खरंच सलाडनं वजन कमी होतं का? हे खरंतर अवलंबून आहे Salad बनवण्याच्या पद्धतीवर. जर सलाड योग्य पद्धतीने बनवले नाही तर वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकतं. कारण यामध्ये आपण हाय कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करतो. त्यामुळे सलाड बनवण्याची योग्य पद्धत काय आहे जाणून घेऊ या त.

ऑइल बेस्ड ड्रेसिंग

A, D, E आणि K या व्हिटॅमिन्सचं फॅटशिवाय पचन होत नाही, थोडं तरी फॅट आवश्यक असतं. त्यामुळे तुम्ही सलाड ड्रेसिंग ऑईल बेस्ड ठेवू शकता. सलाडमध्ये तुम्ही 1 चमचा ऑलिव्ह ऑईल घालू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

हिरव्या भाज्या

दररोज एकाच प्रकारचं सलाड खाणं योग्य नाही. सलाडमध्ये प्रत्येक प्रकारच्या हिरव्या भाज्या महत्त्वाच्या आहेत. कधी ब्रोकोली, कधी पालक, कधी मेथी यांचा समावेश सलाडमध्ये करा. याशिवाय तुळस, रोझमेरीसारखे हर्ब्सही तुम्ही सलाडमध्ये वापरू शकता.  यामुळे तुमचं सलाड हाय कॅलरीयुक्त होईल आणि त्याची चवही वेगवेगळी लागेल.

प्रोटिन

सलाडमधून तुम्हाला आवश्यक तितकं प्रोटिन मिळेल, याचीही काळजी घ्या. यासाठी सलाडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. कडधान्यांव्यतिरिक्त प्रोटिन मिळण्यासाठी पनीर, टोफूही वापरू शकता. यामुळे तुमचं सलाड प्रोटिनयुक्त आणि हेल्दी होईल.

फळांचा समावेश करा

सलाड म्हणजे फक्त भाज्याच खाऊ नका, तर भाज्यांसोबत फळांचाही आहारात समावेश करा, कारण फळांमध्ये सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात.

ब्रेडचे टुकडे वापरू नका

आजकाल Croutons म्हणजे ब्रेडचे तुकडे बाजारात मिळतात, जे अनेकजण आपल्या सलाड, सूपमध्ये टाकतात. व्हाईट ब्रेड क्रूटॉन्समुळे ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. याशिवाय यामध्ये न्यूट्रिएंट्सदेखील कमी असतात, त्यामुळे शक्यतो सलाडमध्ये क्रूटॉन्स टाकू नका. तुम्हाला सलाडमध्ये क्रंचीनेस हवा असेल तर सुकामेव्याचा समावेश करू शकता.

Disclaimer : या लेखात दिलेली माहिती आणि सूचनांना NEWS18 लोकमत पुष्टी देत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

अन्य बातम्या

बटाटा खाऊन वजन वाढणार नाही तर कमी होईल! फक्त खाण्याची पद्धत बदला

चहा बंद नका करू पण कमी नक्कीच करा, नाहीतर या आजारांमुळे होईल पश्चाताप

First published: January 23, 2020, 7:47 AM IST

ताज्या बातम्या