मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Under Eye Skin Care: या 3 चुकांमुळे डोळ्याखाली येतात काळी वर्तुळं; काय कराल?

Under Eye Skin Care: या 3 चुकांमुळे डोळ्याखाली येतात काळी वर्तुळं; काय कराल?

Under Eye Skin Care : डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आपण कोणत्या चुका करू नयेत आणि अशी Dark circles आलीच तर घालवायची कशी?

Under Eye Skin Care : डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आपण कोणत्या चुका करू नयेत आणि अशी Dark circles आलीच तर घालवायची कशी?

Under Eye Skin Care : डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आपण कोणत्या चुका करू नयेत आणि अशी Dark circles आलीच तर घालवायची कशी?

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : आपल्या डोळ्यांखालची त्वचा अतिशय नाजूक असते. अलिकडील चुकीच्या जीवनशैलीमुळं डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांची समस्या आणि डोळ्यांभोवती सूज येणं ही सामान्य समस्या बनली आहे. याची अनेक कारणं आहेत. काही लोकांना आनुवंशिक कारणांमुळं आणि काहींमध्ये लोहाच्या कमतरतेमुळं ही समस्या असते. पण, बहुतांश समस्या झोपेची कमतरता, काही रोग, जास्त ताण, आहारातील निष्काळजीपणामुळे होते. डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आपण (Under Eye Skin Care) कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया. 1. पुरेशी झोप न घेणं नियमित झोप (Sleep) शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषतः रात्री 6 ते 8 तासांची झोप गरजेची आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा त्वचा (Skin) आणि शरीराचे वेगवेगळे भाग झीज भरून काढण्याचे काम करत असतात. कोणत्याही प्रकारचे दाह बरे करण्याचे काम शरीराच्या विश्रांतीच्या काळात सुरू असते. त्यामुळे शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी पुरेशी झोप घ्या. डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळं नीट झोप झाल्यामुळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. हे वाचा - T20 World Cup : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला, दोन्ही देशांच्या खेळाडूंना मिळणार इतके पैसे! 2. मेकअप न काढत झोपणे रात्रीच्या वेळी बाहेरून थकून आल्यानंतर अनेक स्त्रिया मेकअप काढण्यात आळस करतात. मेकअपची विविध उत्पादने डोळ्यांखालील नाजूक त्वचेला हानी पोहोचवू लागतात. जर तुम्ही हे एका दिवसासाठी देखील केले तरी  तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. 3. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी वेळेच्या अभावामुळे अनेक वेळा आपण आपले पोट फास्ट फूडने भरतो आणि हळूहळू शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता जाणवते. डोळ्यांखाली डार्क सर्कल होण्याचे हेही एक मोठे कारण आहे. अशा स्थितीत ताजी फळे, सालाड, दही, अंकुरलेले धान्य इत्यादी नियमितपणे खाणे गरजेचे आहे. डार्क सर्कलपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय - डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज दूर करण्यासाठी कापसाच्या मदतीने बदामाचे तेल लावा. यानंतर 10 मिनिटांसाठी हलके बोटांनी मालिश करा. हे वाचा - फुटबॉल गेमसाठी मागवले सॉक्स Myntra ने पाठवली Bra; संतप्त तरुणाने घेतला धक्कादायक निर्णय तुम्ही पपईचा लगदा काढा आणि त्यात लिंबाचा रस आणि एक चिमूटभर हळद घाला. आता डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लावा आणि मसाज करा. मिक्सरमध्ये बदाम आणि दुधाची पेस्ट बनवा आणि डोळ्यांखाली 20 मिनिटे लावा. टी पॅक आयपॅड म्हणून वापरा. काकडी आणि बटाट्याचे पातळ काप करून आयपॅड म्हणून वापरा. ( सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या