Home /News /lifestyle /

घर भाड्याने दिलं आहे का? मग जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी, आहेत अतिशय कळीच्या

घर भाड्याने दिलं आहे का? मग जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी, आहेत अतिशय कळीच्या

भाड्याच्या घरात राहताना अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते.

भाड्याच्या घरात राहताना अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते.

घर भाड्यानं देणं काही गोष्टींची काळजी न घेतल्यास अतिशय जोखमीचं ठरू शकतं.

    मुंबई,  15 जानेवारी :  कमाई वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला एक म्हणजे आपल्या घराचा एक भाग किंवा आपली एखादी जागा भाड्यानं देणे. जेणेकरून आपण घरी बसून पैसे कमवू शकतो. मात्र आपलं घर भाड्यानं देण्यापूर्वी पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. (tips for giving house on rent) अनेकदा भाडेकरू ठेवताना लोक खबरदारी घेत नाही त्यामुळे ते बऱ्याच अडचणीत सापडतात आणि इतरही अनपेक्षित नुकसान सहन करावं लागू शकतं. म्हणूनच, घर भाड्यानं देण्यापूर्वी आपण काही  खबरदारी घेणं आवश्यक आहे. (what are the things to remember while renting house) घर भाड्यानं देण्यापूर्वी भाडेकरार नक्की बनवा. ज्यात डिपॉझिट, भाडं देण्याची शेवटची तारिख, घर रिकामं करण्याबाबतचे नियम नोंदवणं आवश्यक आहे. त्याचवेळी घर मालकाकडून भाडेकरूला कोणत्या सुविधा मिळतील याचादेखील करारात समावेश करा. (house on rent tips) तसेच घराच्या दुरुस्तीसाठी  आवश्यक गोष्टी अगोदरच ठरवा. याशिवाय आपलं घर भाड्यानं देण्यापूर्वी घराच्या भिंती, छप्पर व वीज इत्यादींची नीट तपासणी करा. एखादी गोष्ट दुरुस्त करायची असेल तर ती अगोदरच दुरुस्त करा, जेणेकरुन नंतर भाडेकरूशी वाद होणार नाही. (what to check while giving house on rent) हेही वाचा लग्नाआधी Solo Travel करण्याचा विचार करताय? तर मग आधी 'हे' वाचा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती द्या घरातील पंखे, बल्ब, पाईप्स आणि इलेक्ट्रिकल फिटिंग्ज, पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टींबद्दल जाणून घ्या. तसेच, आपल्या भाडेकरूला याची संपूर्ण माहिती द्या.  घर रिकामं करताना कोणतीही अडचण यामुळं उद्भवणार नाही आपलं घर भाड्यानं देण्यापूर्वी, भाडेकरूची कसून तपासणी करा. भाडेकरू कुठे आणि काय काम करतो याबद्दल आवश्यक माहिती मिळवा. तसेच भाडेकरूची पोलिस पडताळणीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केली जाणे आवश्यक आहे. हेही वाचा वयाच्या 51व्या वर्षी दिली 12वीची परीक्षा; निकाल बघून पतीला बसला धक्का याशिवाय, घर भाड्यानं देण्यापूर्वी आपल्या भाडेकरूच्या कुटूंबाबद्दल जाणून घ्या. तसेच त्याच्या आणि त्याच्या वैवाहिक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती ठेवा. भाडेकरूचे उत्पन्नदेखील जाणून घ्या. जर भाडेकरू कोणाकडून आला असेल तर, त्या व्यक्तीकडून भाडेकरूची संपूर्ण माहिती घ्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Tips

    पुढील बातम्या