फक्त करा या सोप्या 3 गोष्टी, काही दिवसांमध्ये तल्लख होईल बुद्धी

बदलती जीवनशैली, अवेळी खाणं- पिणं या सर्वाचा परिणाम कळत- नकळतपणे आपल्या मेंदूवर होत असतो. त्यामुळे अनेकदा महत्त्वाच्या गोष्टीही विसरायला होतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 06:43 PM IST

फक्त करा या सोप्या 3 गोष्टी, काही दिवसांमध्ये तल्लख होईल बुद्धी

अनेकदा कामाच्या व्यापात आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरतो. बदलती जीवनशैली, अवेळी खाणं- पिणं या सर्वाचा परिणाम कळत- नकळतपणे आपल्या मेंदूवर होत असतो. त्यामुळे अनेकदा महत्त्वाच्या गोष्टीही विसरायला होतात. जर तुम्हाला स्वतःची बुद्धी तल्लख करायची असेल तर पुढील तीन महत्त्वाच्या गोष्टी नक्की वाचा.

1 मेंदू तल्लख करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे मेंदूला आराम देणं. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही दररोज 8 तास शांत झोप घ्याल. तुमची झोप पूर्ण झाली तर दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि अनेक गोष्टी नियोजित वेळेनुसार होतील.

2  तुळशीच्या पानात अँटी- ऑक्सीडंटचे गुण असतात. हे मेंदूसाठी फार फायदेशीर असतात. तुळशीची पानं दररोज खाल्ल्याने बुद्धी तल्लख व्हायला मदत होते. दालचीनीच्या पाउडरसोबत मध खाल्ल्यानेही तणाव दूर होतो आणि मेंदूला आराम मिळतो.

3 बदामात ओमेगा-3 आणि फॅटी अॅसिडचे तत्त्व असतात. यामुळे बुद्धी तल्लख व्हायला मदत होते. बदामासोबत दूध प्यायल्यास त्याचा पूर्ण शरीराला चांगला फायदा होतो.

थकवा घालवायचा आहे तर उपवासाचा हा पदार्थ आवर्जून खा!

Loading...

VIDEO: गांधीलमाशी मारण्यासाठी त्याने वापरले फटाके, अखेर घराचं छप्पर जळालं

'या' प्राण्यांना लागते सर्वात जास्त थंडी, तुमच्याकडे आहे का यातला कोणता प्राणी?

VIDEO: अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय, ईडीच्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नीचा सरकारला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...