मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हनिमून ट्रिप परफेक्ट बनवायचीय? मग फक्त डेस्टिनेशनच नाही या गोष्टींचंही करा प्लॅनिंग

हनिमून ट्रिप परफेक्ट बनवायचीय? मग फक्त डेस्टिनेशनच नाही या गोष्टींचंही करा प्लॅनिंग

बरेच जोडपे लग्नानंतर हनिमून प्लॅन करतात आणि यासाठी जोडपी रोमँटिक ठिकाणाच्या शोधात असतात. हनिमून डेस्टिनेशन व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खास क्षणांचा आनंद घेऊ शकता.

बरेच जोडपे लग्नानंतर हनिमून प्लॅन करतात आणि यासाठी जोडपी रोमँटिक ठिकाणाच्या शोधात असतात. हनिमून डेस्टिनेशन व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खास क्षणांचा आनंद घेऊ शकता.

बरेच जोडपे लग्नानंतर हनिमून प्लॅन करतात आणि यासाठी जोडपी रोमँटिक ठिकाणाच्या शोधात असतात. हनिमून डेस्टिनेशन व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खास क्षणांचा आनंद घेऊ शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 17 नोव्हेंबर : लग्नानंतर बहुतेकांना हनिमूनला जायला आवडते. त्याचबरोबर हनिमूनला खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक खूप काही करतात. सर्वोत्तम डेस्टिनेशन शोधतात, त्यासाठी बक्कळ पैसेही खर्च करतात. जोडीदारासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी लोक आपल्या हनीमूनच्या तयारीमध्ये कोणतीही कसर सोडत नाही.

परंतु परफेक्ट हनिमून ट्रीपसाठी केवळ सर्वोत्तम ठिकाणाची निवड करणे पुरेसे नाही. हनिमूनला पार्टनरसोबत काही सुंदर क्षण एन्जॉय करणेही आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्यास तुम्ही तुमच्या ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत हनिमून ट्रिप अगदी खास आणि अविस्मरणीय बनवू शकता.

Relationship Tips : उत्तम संवादाने नातं होईल अधिक घट्ट, पार्टनरसोबत बोलताना या गोष्टी ठेवा लक्षात

निसर्ग प्रेमी व्हा

जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर निसर्गाशी संबंधित काही गोष्टींच्या जवळ जाऊन तुम्ही तुमचा हनिमून खास बनवू शकता. यामुळे तुमचं मन शांत तर राहिलच पण तुमच्या पार्टनरला समजून घेण्याचीही संधी मिळेल. अशात समुद्रकिनाऱ्यावर किंवा पर्वतांमध्ये शांत ठिकाणी हनिमूनची योजना करणे तुमच्यासाठी योग्य असेल.

चमकणारे तारे

लहानपणी लोक आकाशाकडे पाहून तारे मोजतात. पण जीवनाच्या धावपळीत बहुतेक जण बालपणीची शांतता गमावून बसतात. हनिमूनला तुमच्या जोडीदारासोबत खुल्या आकाशाखाली बसून तुम्ही फक्त लुकलुकणारे तारेच पाहू शकत नाही तर हा क्षण रोमँटिकदेखील बनवू शकता.

लक्झरीचा आनंद घ्या

जर तुमचा हनिमून खूप महाग असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत लक्झरी एन्जॉय करू शकता. होय, तुमच्या जोडीदारासोबत बॉडी मसाजचा आनंद घेण्याव्यतिरिक्त, तुम्ही लक्झरी रूममध्ये दर्जेदार वेळ घालवून हे क्षण खास बनवू शकता.

जुने क्षण किंवा फोटो रिक्रिएट करू शकता

लग्नाआधी अनेकदा लोक जोडीदारासोबतची प्रत्येक भेट खास बनवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर लग्नानंतर हनिमूनच्या जुन्या आठवणीही ताज्या करू शकता. उदाहरणार्थ सुंदर कॅन्डल लाईट डिनर आयोजित करण्याबरोबरच, तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊन हनिमून अविस्मरणीय बनवू शकता. त्याचसोबत तुमचे जोडीदारासोबतचे काही जुने क्षण रिक्रिएटी करू शकता.

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करू नका या गोष्टी, नात्यात येईल दुरावा

मनातल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करा

या काळात तुमच्याकडे एकमेकांविषयी जाणून घेण्यासाठी खूप वेळ असतो. अशावेळी एकमेकांशी मनसोक्त बोला, एकमेकांचे म्हणणे ऐका. तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या पार्टनरसोबत शेअर करा. जोडीदारासोबत तुमच्या अपेक्षा शेअर करून तुम्ही हे नाते आणखी मजबूत करू शकता.

First published:

Tags: Lifestyle, Relationship tips, Travelling