कोरोनामुळे वाढती चिंता-कामाचा हृदयावर ताण; हेल्दी आणि फिट Heart साठी सोपे उपाय

कोरोनामुळे वाढती चिंता-कामाचा हृदयावर ताण; हेल्दी आणि फिट Heart साठी सोपे उपाय

कोरोनाच्या महासाथीमुळे (covid 19 pandemic) आरोग्याच्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे. यात सर्वात महत्त्वाचं आहे ते हृदयाचं आरोग्य (heart health).

  • Share this:

मुंबई,06  नोव्हेंबर : कोरोना महासाथीमुळे (coronavirus) घरातच कोंडून घ्यावं लागलेल्या प्रत्येकासाठी हे वर्ष ताणतणावाचं ठरत आहे. तरुण पिढी वर्क फ्रॉम होम करत असली तरी घरातल्या घरात साधे साधे व्यायाम प्रकार करून स्वत:चा फिटनेस राखत आहे. मात्र वयोवृद्ध लोकांना काहीच करता येत नाही आहे. आरोग्याच्या तक्रारींबाबत ते फारसे काही करू शकत नाहीत. कोरोनाच्या धास्तीपायी आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयाचं आरोग्य (heart health) राखण्याचा धोका निर्माण होतो आहे.

जीवनशैलीत बदल करून आणि आरोग्याच्या सवयी लावून घेऊन हृदयाचे विकार )(heart disease) टाळता येऊ शकतात. निरोगी हृदयासाठी कोणत्याही वयोगटातील लोकांनी घरच्या घरी अवलंबावेत असे सोपे उपाय.

आहार, खाण्यापिण्याच्या सवयी

हृदय निरोगी ठेवायचं तर आरोग्यदायी आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, फळांचा आहारात समावेश करतानाच जंक फूडचं प्रमाणाबाहेर सेवन टाळावं. नियमितपणे पुरेसं पाणी पिणं हृदयासाठी चांगलं ठरतं.

 दैनंदिन कार्ये

दररोजचं ठराविक रूटीन ठरवून घेऊन ते काटेकोरपणे पाळावं. ठरवून घेतलेल्या वेळेवर झोपणं आणि झोपेतून उठणं दैनंदिन कामकाजाचा शरीराचा समतोल राखण्यात उपयुक्त ठरतं. अधूनमधून पुरेशी विश्रांती घेणं, वीकेंडला आरामदायक राहणीमान तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी पूरक आहे.

डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडून राहणं

डिप्रेशनसारख्या मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या एकाकीपणामुळे निर्माण होतात. याचा हृदयावरही परिणाम होतो. त्यामुळे जवळच्या मित्रांशी व्हिडिओ कॉलवरून बोला, झूम कॉन्फरन्सेसमध्ये सहभागी व्हा, ऑनलाइन क्लास जॉईन करा.

धूम्रपान, मद्यपान बंद करा

धूम्रपान आणि मद्यपान करणं तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरतं. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीदेखील खालावते आणि संसर्गाचा धोका वाढतो.

हे वाचा - ताप, खोकलाच नव्हे तर मानसिक गोंधळ उडणं हेही आहे कोरोनाचं प्राथमिक लक्षण

वजनावर लक्ष ठेवा

आरोग्याला पूरक एवढंच वजन असायला हवं. त्यामुळे वजन आणि बॉडी मास इंडेक्सच्या (बीएमआय) नोंदी ठेवा. निरोगी शरीरातच हृदयाचं कार्य निकोपपणे चालेल. तसंच इतरही आजार बळावण्याची शक्यता उरणार नाही.

निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा

आरोग्य अबाधित राखण्यासाठी कोणताही व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. चालणं, एरोबिक्स किंवा डान्सिंगसारखे हलके व्यायाम प्रकार दररोज 30  मिनिटांपर्यंत करा. व्यायामाचे दररोज रुटीन ठरवून घ्या.

कामात अधूनमधून ब्रेक घ्या

काम करत असताना अधूनमधून थोड्या वेळासाठी ब्रेक घेणं चांगलं. त्यामुळे ताण कमी होऊन रिलॅक्स होता येतं. हृदयाच्या आरोग्यासाठी असं करणं उपयुक्त ठरतं.

आजारांकडे दुर्लक्ष करू नका

शरीरातील लहानसहान दुखण्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जसं की छाती दुखणं, श्वासोच्छवासास अनावश्यक त्रास, पायांवर सूज येणं आणि भोवळ किंवा चक्कर येण्यासारख्या प्रकारांना किरकोळ समजू नका. हे हृदयाशी संबंधित विकार असू शकतात. वय वर्षे 70 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.

हे वाचा - बसताना, झोपताना तुमचे पायही सुन्न होतात? गंभीर आजाराचे शिकार तर नाही झालात ना?

औषधं नियमित आणि वेळेवर घ्या

हृदयासंबंधी आजार असलेल्यांनी आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल असेल अशा लोकांनी नियमित आणि वेळच्यावेळी आपली औषधं घेतली पाहिजे. रूटीन चेक-अप नियमितपणे केलं पाहिजे.

Published by: Priya Lad
First published: November 6, 2020, 7:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading