• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • तारुण्याचं सिक्रेट! अकाली वृद्धत्व टाळण्याचे सोपे मार्ग

तारुण्याचं सिक्रेट! अकाली वृद्धत्व टाळण्याचे सोपे मार्ग

तुमच्या सवयीच तुम्हाला लवकर म्हातारं करत आहेत.

  • Share this:
मुंबई, 22 ऑक्टोबर : वय वाढलं तरी आपण तरुण (Young) दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. तरुण, सुंदर आणि सुडौल दिसण्यासाठी स्त्रिया विशेष प्रयत्न करतात. काही स्त्रिया तर याकरिता शस्त्रक्रियेसारख्या पर्यायांचीदेखील निवड करतात. पण चेहऱ्यावर सुरकुत्या (Aging) दिसणं किंवा अकाली वृद्ध दिसणं (Premature aging) यासाठी आपली दिनचर्या (Routine) बऱ्याच अंशी कारणीभूत असते. सध्याच्या काळात अवेळी आणि चुकीचा आहार घेणं, पुरेशा व्यायामाचा अभाव, सातत्यानं लॅपटॉप किंवा मोबाइलचा होणारा अतिवापर या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम दिसून येत (Early aging) असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं आणि एकंदरीतच अकाली वृद्ध दिसणं हे याचेच परिणाम म्हणता येतील. चेहऱ्यावर अकाली दिसणाऱ्या सुरकुत्यांना आपला आहार (Diet) कारणीभूत असतो, असं अनेकजण मानतात. हे काहीअंशी खरं असलं, तरी त्यासोबत अन्य घटकही पूरक ठरत असल्याचं संशोधक सांगतात. अकाली वृद्ध दिसू नये यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक असतं. वाढतं वजन (Weight gain) आणि अयोग्य जीवनशैली एजिंगसाठी कारणीभूत ठरते. अकाली वृद्धत्व कसं टाळाल आठवड्यातील किमान 5 दिवस रोज 1 तास व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. शरीरातलं रक्ताभिसरण वाढल्यानं त्वचा (Skin) चमकदार होते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात. आनंद आणि चिंता या दोन्ही मानसिक बाबींचा शरीरावर परिणाम होतो. हसल्यानं (Laughing) चेहऱ्यावरच्या स्नायूंचा व्यायाम होतो आणि सुरकुत्या कमी होतात. ही बाब तज्ज्ञांनीही मान्य केली आहे. हे वाचा - या 4 गोष्टींबद्दल गैरसमज नको! अ‌ॅसिडिटी आणि गॅसेसच्या समस्या असतील तर आवर्जून खा तीव्र उन्हात (Heat) फिरल्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. तीव्र उन्हात घराबाहेर पडणं गरजेचं असेल, तेव्हा अंगभर कपडे परिधान करावेत किंवा त्वचेला 30 एसपीएफचं लोशन लावावं. त्वचेमध्ये पुरेशी आर्द्रता नसणं हेदेखील अकाली वृद्ध दिसण्याचं एक कारण आहे. त्यामुळे स्नान केल्यानंतर लगेचच त्वचेवर मॉश्चरायझर लावलं पाहिजे. तसंच शरीरातलं पाणी कमी होऊ नये यासाठी दररोज 8 ग्लास पाणी प्यावं. यामुळे सुरकुत्या कमी होऊन चेहरा तजेलदार दिसू लागेल. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू नयेत यासाठी आहारात बदल करावा. तेलकट आणि तिखट पदार्थ वर्ज्य करावेत. व्हिटॅमिन ईयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. कारण यात अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. तसंच आहारात हिरव्या पालेभाज्या, किवी, लिंबू, सुकामेवा आणि दुग्धजन्य पदार्थांचा नियमित समावेश असावा. हे वाचा - या नैसर्गिक गोष्टी मधुमेहावर आहेत रामबाण उपाय, रक्तातील साखर राहील नियंत्रणात एका कुशीवर सातत्यानं झोपल्यानं चेहरा उशीला घासतो. त्यामुळे सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे या पद्धतीनं झोपणं टाळावं, असं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात लिहिलं आहे. जर्नल स्प्रिंगर लिंकच्या संशोधनानुसार, साखर (Sugar) खाल्ल्यानंतर ग्लायकेशन प्रक्रियेदरम्यान तिचं रूपांतर धोकादायक फ्री रॅडिकल्समध्ये होतं आणि ही बाब पेशींसाठी नुकसानदायी ठरते. पबमेड जिओ जर्नलच्या म्हणण्यानुसार, तुम्ही आठवड्यातले 4 दिवस 8 तासांच्या शिफ्टमध्ये संगणकावर काम करत असाल, तर हा वेळ भर उन्हात 20 मिनिटं फिरल्याप्रमाणे आहे. त्यामुळे ही बाबदेखील तुमच्या त्वचेसाठी नुकसानदायी आहे. हे वाचा - 'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका; यात तुमचा रक्तगट तर नाही ना? अकाली वृद्ध दिसणं, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणं हे टाळायचं असेल तर योग्य पोझिशनमध्ये झोपणं, साखरेचं सेवन मर्यादित करणं आणि स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं गरजेचं आहे, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
First published: