आयुर्वेदानुसार जाणून घ्या जेवणात कसं, कधी आणि काय खावं...

आयुर्वेदात खाण्या- पिण्याची प्रत्येक वेळ ठरवण्यात आली आहे. याशिवाय या सर्व गोष्टी लोकांच्या शरीररचनेनुसार ठरवण्यात आल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 02:16 PM IST

आयुर्वेदानुसार जाणून घ्या जेवणात कसं, कधी आणि काय खावं...

आपण दिवसभर जे काही खातो ते शरीरासाठी फायदेशीर असतंच असं नाही. आयुर्वेदात खाण्या- पिण्याची प्रत्येक वेळ ठरवण्यात आली आहे. याशिवाय या सर्व गोष्टी लोकांच्या शरीररचनेनुसार ठरवण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार शरीराला काय योग्य आहे आणि ते कधी आणि कसं खावं हे सांगण्यात आलं आहे.

वात, पित्त आणि कफ या शरीराच्या तीन मुख्य प्रकृती आहेत. शरीरात जेव्हाही या तीनपैकी एकाचंही संतुलन बिघडलं की व्यक्ती आजारी पडतात. याचमुळे सहसा आयुर्वेदात जेवण सहजरित्या पचेल आणि ते पोषकही असेल असं खाणं खाण्याला प्राधान्य दिलं जातं. तसेच नियमित संतुलित आहार घेण्यावरही भर दिला जातो.

खाण्यात सहा रस असणं आवश्यक-

आयुर्वेदानुसार जेवणात गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट हे सहाही रस असणं आवश्यक आहे. यामुळे शरीरातील पोषक तत्त्व संतुलित राहतात.

ज्याची वात प्रकृती आहे त्यांनी आहारात गोड आणि खारट गोष्टींचा अधिक समावेश करावा. याशिवाय ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी तिखट आणि तुरट खाण्यावर भर दिला पाहिजे.

Loading...

कफ प्रकृतीच्या लोकांनी तिखट आणि तुरट गोष्टींचा समावेश करावा.

जेवणाशी निगडीत गोष्टींकडे विशेष लक्ष द्या-

-भाज्या जास्त शिजवू नका. भाज्या जास्त शिजलेल्या किंवा कच्च्याही राहू नये.

-साखरेऐवजी मध किंवा गुळाचा वापर करा. तर मैद्याऐवजी दलिया किंवा पीठाचा वापर करा.

-आल्याचा एक छोटा तुकडा तव्यावर भाजून घ्या. त्यावर सेंधव मीठ लावा. जेवणाच्या पाच मिनिटं आधी हा तुकडा खा. यामुळे भूक वाढचे आणि खालेल्लं पचतही.

-जंक फूडमध्ये सोडियम, ट्रान्सफॅट आणि शर्करा मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे या गोष्टी खाऊ नयेत. तसेच बाजारातील सॉफ्ट ड्रिंकही कधीच पिऊ नये.

-जेवण नेहमी ताजं आणि गरम खावं. यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने पचतं.

-जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध खाणं खावं. यामुळे ते सहज पचत आणि शरीरात आवश्यक ते पोषक तत्त्व चांगल्या पद्धतीने मिसळतात.

जेवण आणि या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळू नका-

-कोणत्याही फळासोबत दूध पिणं योग्य नाही. हल्ली शेक म्हणून आपण अनेक फळ दुधासोबत पितो. पण आयुर्वेदात हे अत्यंत चुकीचं आहे. याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.

-यासोबतच थंडगार दह्यासोबत गरम पराठेही खाऊ नयेत.

-दुधासोबत असा एकही पदार्थ खाऊ नये ज्यात मीठ असेल.

कधीतरीच खा या गोष्टी-

पनीर- आठवड्यातून दोनवेळा खा.

स्प्राउट- आठवड्यातून दोनवेळा खा. चांगले उकडून घ्या आणि त्यात मीठ लिंबू मिसळून खाऊ शकता.

दही- दररोज दही खाल्ल्याने लठ्ठपणा, हाडं दुखणं, मधुमेह असे आजार होऊ शकतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आजच मोडा जेवणानंतर पाणी पिण्याची सवय, होतील गंभीर आजार

पितृपक्षाच्या महिन्यात चुकूनही ही 7 कामं करू नका!

जाणून घ्या, पत्नीला खूश ठेवण्याचे 10 उपाय

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...