मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

केसांना हायलाईट करताना या ट्रिक्सचा करा वापर; लूकमध्ये दिसेल फरक

केसांना हायलाईट करताना या ट्रिक्सचा करा वापर; लूकमध्ये दिसेल फरक

hair highlighting tips

hair highlighting tips

सध्या केसांच्या बटा रंगवून म्हणजेच केसांना हायलाईट करून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. केसांना हायलाईट करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर :  सुंदर आणि लांब केस व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालतात. आपले केस लांब असावेत अशी प्रत्येक महिला, मुलीची इच्छा असते. फॅशनच्या बदलत्या काळात केशरचनेवर विशेष लक्ष दिलं जातं. आपलं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे दिसावं यासाठी ना ना तऱ्हेचे प्रयोगही केले जात आहेत. अनेक महाविद्यालयीन तरुणी त्यांच्या लूकबद्दल नेहमी सजग असल्याचं पाहायला मिळतं. स्वत:चा लूक वेगळा आणि आकर्षक बनवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. सध्या केसांच्या बटा रंगवून म्हणजेच केसांना हायलाईट करून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. केसांना हायलाईट करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे.

त्वचेच्या रंगाच्या हिशेबाने निवडा हेअर कलर

केसांना हायलाईट करण्याआधी योग्य हेअर कलरची निवड करणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेच्या रंगाच्या हिशेबानं म्हणजेच स्कीन टोननुसार केसांना कुठला कलर वापरावा याचा विचार करायला हवा. थोडक्यात काय तर स्कीन टोन आणि हेअर कलर याची व्यवस्थित सांगड घातली गेली तर निश्चितच व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसतं. इतरांनी जो कलर वापरला आहे तो आपल्यावरही चांगला दिसेलच याची काही खात्री नसते.

हेही वाचा - Ayurved Tips : अंग खाजतंय? तर घरीच करा हे उपाय, मिळेल लगेच आराम

केसांच्या बटाच करा हायलाईट

केसांमधील थिन लेअरच म्हणजे केसांच्या बटाच हायलाईट करायला हव्यात,असा सल्ला केशरचना तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती आणि हेअर स्टायलिस्ट देत असतात. थिन लेअर हायलाईट करण्यासाठी केसांमध्ये लहान लहान भाग केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. थिन लेअर हायलाईट न करता थिक लेअर हायलाईट केल्यास ते चांगलं दिसत नाही. केसांमध्ये वेगळी चमक येत नाही आणि व्यक्तीमत्व खुलून दिसत नाही.

प्रोफेशनल्सचा घ्यावा सल्ला

केशरचना करून व्यक्तिमत्वात भर घालत असाल तर ते चांगलंच आहे. त्यासाठी विविध प्रयोग केले तरी हरकत नाही; पण केसांना हायलाईट करताना या क्षेत्रातील व्यावसायिकांचा म्हणजेच प्रोफेशनल्सचा सल्ला जरूर घ्यायला हवा. हेअर कलर निवडीमध्ये कुठलीही चूक होऊ नये, म्हणून ही बाब करणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. केसांना हायलाईट करताना नेहमी चांगली उत्पादनंच वापरावीत. स्वस्त किंवा ब्रँडेड उत्पादन नसेल तर केसांचा नैसर्गिक रंगही आपण गमावून बसू शकतो.

लग्न समारंभ, एखादी पार्टी किंवा सणासुदीत केसांच सौंदर्य वाढवण्यासाठी महिला अनेकप्रकारे प्रयत्न करत असतात. विविध प्रकारच्या केशरचना करण्यासह त्यांना हायलाईट किंवा कलर करण्याचा प्रकार तर सध्या वाढला आहे. यासाठी बाजारातही विविध प्रकारची उत्पादनं उपलब्ध आहेत. अनेक महिला, तरुणी तर कुठलाही सल्ला न घेता स्वत:हून केशरचनेचा प्रयत्न करतात. परंतु, असं केल्यानं केसांची नैसर्गिक चमक गमावून बसते आणि आपल्या सौंदर्यावरही त्याचा वेगळा परिणाम होतो. केशरचना व केसांना हायलाईट करणं याच्याशी संबंधित उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे प्रयोग करून केसांचं सौंदर्य आपण वाढवू शकतो; पण असं करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

First published:

Tags: Fashion, Lifestyle