लग्नानंतर मुलीने केला व्हिडीओ कॉल, ढसाढसा रडायला लागले बाबा; पाहा हा भावुक VIDEO

लग्नानंतर मुलीने केला व्हिडीओ कॉल, ढसाढसा रडायला लागले बाबा; पाहा हा भावुक VIDEO

या व्हिडीओत मुलीचा फोन आल्यावर बाबा फोनचा सतत मुका घेतात आणि नंतर न राहून फोन दुसऱ्यांच्या हातात देऊन निघून जातात.

  • Share this:

टिकटॉकवर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही व्हिडीओ हे भावुक करणारे असतात. आज  बाप-लेकीचं प्रेम दाखवणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला. लग्नानंतर मुलीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला. मुलीशी बोलताना बाबांना अचानक रडू कोसळलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही फार भावुक व्हाल यात काही शंका नाही. या व्हिडीओत मुलीचा फोन आल्यावर बाबा फोनचा सतत मुका घेतात आणि नंतर न राहून फोन दुसऱ्यांच्या हातात देऊन निघून जातात. मुलगी सासरी जाण्याचं दुःख जेवढं आईला असतं तेवढंच ते बाबांनाही असतं हेच हा व्हिडीओ सांगून जातो.

याशिवाय एक मजेशीर व्हिडीओ टिकटॉकवर ट्रेण्डमध्ये आहे. यात काही लोक पावसात रेनकोट आणि हेल्मेट घालून दांडिया खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अनेकांनी लाइक केला असून हजारो लोकांनी शेअरही केला आहे. याशिवाय टिकटॉक ट्रेण्डिंगवरून आम्ही तुमच्यासाठी टॉप 5 जबरदस्त व्हिडीओ आणले आहेत. हे व्हिडीओ पाहून तुम्ही एकक्षण भावुक व्हाल तर दुसऱ्या क्षणी पोट धरून हसालही...

Published by: Madhura Nerurkar
First published: October 2, 2019, 1:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading