केस कापायला गेलेल्या व्यक्तीला सतत येत होते फोन, मग रागात त्याने... ; पाहा हा Viral Video

केस कापायला गेलेल्या व्यक्तीला सतत येत होते फोन, मग रागात त्याने... ; पाहा हा Viral Video

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने नुकताच एक व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने नुकताच एक टिकटॉक व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती केस कापण्यासाठी सलूनमध्ये जातो. तिथे गेल्यावर त्याला सतत फोन येत असतात. यानंतर ती व्यक्ती आपल्या डोक्यावरचा केसांचा टोप काढून खुर्चीवर ठेवतो आणि केस कापणाऱ्याला त्या विगचे केस कापायला सांगतो. त्या व्यक्तीची ही कृती पाहताच तिथे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. सोशल मीडियावर हा टिकटॉक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आयुष्मान खुरानाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. आयुष्मान खुरानाचा आगामी 'बाला' सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याने शेअर केलेहा व्हिडीओ पाहून 'बाला' सिनेमातही तो अशीच धम्माल करेल अशा चर्चा सध्या होत आहेत. आतापर्यंतचे आयुष्मानचे सिनेमे पाहिले तर त्याने नेहमीच वेगळ्या विषयांचे सिनेमे करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे त्याचा 'बाला' सिनेमाही तसा वेगळा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुरानाच्या 'बाला' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा ट्रेलर प्रचंड आवडला असून सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची चाहते वाट पाहत आहेत. या सिनेमात आयुष्मानसह भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका आहेत तर जावेद जाफरीचीही महत्त्वपूर्ण भूमिका यात दिसेल.

लीवर सिरोसिस आजाराशी लढतायेत बिग बी, जाणून घ्या याची लक्षणं

याहून सोप्या रांगोळी डिझाइन तुम्हाला Tiktok, Youtube शिवाय दुसरीकडे दिसणार नाहीत

आता रात्रीची शिळी चपाती करणार मधुमेहावर उपचार, खायला विसरू नका!

या योगासनांच्या मदतीने करा पोटाची चरबी कमी, कधीही घ्यावी लागणार नाहीत औषधं!

आता खुशाल झोपा, कारण तुमच्या प्रत्येक समस्येवर हेच आहे उत्तर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 02:01 PM IST

ताज्या बातम्या