जेव्हा साडी नेसून मुलांनी केला रॅम्प वॉक, TikTok व्हिडीओ झाला VIRAL

आठ दशलक्षहून अधिक लोकांनी गूगल प्ले स्टोअरवर टिकटॉक अॅपचा रिव्ह्यू दिला आहे. यावरूनच भारतात टिकटॉक अॅपची किती प्रसिद्ध आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 02:34 PM IST

जेव्हा साडी नेसून मुलांनी केला रॅम्प वॉक, TikTok व्हिडीओ झाला VIRAL

टिकटॉक (TikTok) मध्ये शेअर होणारे अनेक व्हिडीओ हे हमखास व्हायरल होतात. सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर याच व्हिडीओंची चलती असते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. TikTok व्हिडीओ बनवून त्याला फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर काहीक्षणात व्हायरल होण्याचा नवा ट्रेण्ड सुरू होतो. लाखो लोक हे  TikTok व्हिडीओ पाहून तो लाइक करून शेअरही करतात. टिकटॉक हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशन आहे ज्यामार्फत स्मार्टफोन युझर 15 सेकंदांचे छोटे व्हिडीओ शेअर करतात.

असाच एक छोटा टीकटॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात मुलं साडी नेसून रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. व्हिडीओत मुलांचा एक ग्रुप मैदानात मॉडेलप्रमाणे कॅटवॉक करताना दिसत आहेत.

या दोन व्हिडीओशिवाय अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक महिला जुन्या साडीपासून आकर्षक सूट तयार करताना दिसत आहे. जुनी झालेली साडी फेकून देण्यापेक्षा त्याचा सुंदर असा पटियाला सूट शिवताना दिसत आहे. तुम्ही कधी साडीपासून पटियाला सूट बनवला नसेल तर हा व्हिडीओ तुमच्या फायद्याचा आहे. यावरूनच तुम्हाला अजून अनेक संकल्पना सुचतील.

Loading...

भारतात टिकटॉक डाउनलोड करणाऱ्यांचा आकडा 100 दशलक्षपेक्षा जास्त आहे. रिपोर्टनुसार, भारतात दर महिन्याला सुमारे 20 दशलक्ष लोक हा अॅप वापरतात. 8 दशलक्षहून अधिक लोकांनी गूगल प्ले स्टोअरवर टिकटॉक अॅपचा रिव्ह्यू दिला आहे. यावरूनच भारतात टिकटॉक अॅपची किती प्रसिद्ध आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे, टिकटॉक अॅप वापरणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाव आणि छोट्या शहरातील लोकांचा समावेश आहे. त्यातही कमी वयोमान असणाऱ्या मुलांमध्ये या अॅपचं क्रेझ तुफान आहे. अनेकदा सेलिब्रिटीही हा अॅप वापरून त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत.

...म्हणून पंतप्रधान मोदी आहेत फिट, असा असतो त्यांचा दिवसभराचा हेल्दी आहार

डेंग्यूशी निगडीत या 7 गैरसमजांवर तुम्हीही ठेवत असाल डोळे बंद ठेवून विश्वास

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या या 7 फेवरेट आसनांनी फिटनेस आहे 'मुमकिन'

या लक्षणांवरून ओळखा तुमच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...