70 वर्षांची म्हातारी हत्तीण आठवतेय का? अशक्तपणामुळे अखेर ती कोसळली

टिकीरी ही 60 हत्तींपैकी एक आहे ज्यांना श्रीलंकेतील कँडी येथील बुद्ध उत्सव एसला परेरामध्ये सक्तीने भाग घ्यावा लागतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 06:19 PM IST

70 वर्षांची म्हातारी हत्तीण आठवतेय का? अशक्तपणामुळे अखेर ती कोसळली

परेरा, 16 ऑगस्ट- काही दिवसांपासून सोशल मीडियावर 70 वर्षांच्या टिकीरी हत्तिणीचे खंगलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हत्तिणीला श्रीलंकेतील परेरा महोत्सवात परेड करण्याची सक्ती करण्यात आली होती. सेव्ह एलीफंट फाउंडेशन या फेसबुक पेजवरून या हत्तिणीचे होणारे हाल आणि छळ सांगण्यात आले होते. दरम्यान आता टिकीरी हत्तिणीची तब्येत खालावली असून ती एवढी अशक्त झाली आहे की तिला साधं उठताही येत नाही. खंगलेल्या हत्तिणीला सलग 10 दिवस श्रीलंकेतील परेरा महोत्सवात परेड करण्याची सक्ती करण्यात आली होती. यात तिचे एवढे हाल झाले की ती कोसळून पडली आणि ती आता स्वतःच्या पायावर उभीही राहू शकत नाही.

सेव्ह एलीफंट फाउंडेशनने तिचा अजून एक फोटो शेअर करत या संदर्भात माहिती दिली. हा फोटो पाहून कोणाचंही मन हेलावून जाईल यात काही शंका नाही. या फोटोत टिकीरी जमिनीवर पडलेली दिसत आहे. तिच्या आजूबाजूला अनेक लोकांनी गर्दी केली आहे.

हा हृदयद्रावक फोटो शेअर करताना फाउंडेशनने म्हटलं की, 'कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. तिच्यासाठी चालणं आणि काम करणं शक्य नाही. ज्या दिवशी आम्ही तिला भेटलो तेव्हा डॉक्टरांनी तिची प्रकृती उत्तम असून ती चालू शकते असं सांगितलं. काही लोक हे हृदयातून आंधळे असतात आणि त्यांच्या मनात दुसऱ्यांसाठी कोणतीही दया नसते. जरा एकदा या बिचाऱ्या हत्तिणीकडे पाहा जी निपचित पडली आहे आणि संपूर्ण जग तिच्याकडे पाहतंय.' धर्म आणि प्रथांच्या नावाखाली पृथ्वीवर प्राण्यांचे कसे हाल केले जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे.

दरम्यान,  सेव्ह एलीफंट या फाउंडेशनने यापूर्वीही टिकीरी संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी लिहिले होते की, गोंगाट, कर्कर्श फटाके आणि प्रचंड धुरळ्यात टिकीरीला या परेडमध्ये चालावं लागलं. या उत्सवात लोकांना बरं वाटावं यासाठी तिला प्रत्येक रात्री कित्येक किलोमीटर चालावं लागलं. तिला जड कपडे आणि लाइट्स लावून तयार केलं जातं, जेणेकरून तिची हाडं कोणाला दिसणार नाहीत.

Loading...

एका रिपोर्टनुसार, सेव्ह एलिफंट फाउंडेशनचे संस्थापक लेक चॅलर्टने म्हटलं की, टिकीरी ही 60 हत्तींपैकी एक आहे ज्यांना श्रीलंकेतील कँडी येथील बुद्ध उत्सव एसला परेरामध्ये सक्तीने भाग घ्यावा लागतो. चॅरिटी प्रमुख म्हणाले की, त्यांना उत्सवातील लोकांची श्रद्धा आणि एकंदरीत होणारा जल्लोष याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण, याचा प्राण्यांना कोणताही त्रास होता कामा नये. याच फाउंडेशनने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘प्रेम करणं, कोणाला इजा न पोहोचवणं, दया आणि करुणेच्या मार्गावर चालणं हाच बुद्धाचा मार्ग आहे. या मार्गाचं पालन करण्याची ही योग्य वेळ आहे.’

एसला परेरा हा बुद्धाचा मोठा उत्सव असतो. श्रीलंकेत हा उत्सव भव्यतेने साजरा केला जातो. परेरा हे स्थळ जगातील सर्वात प्राचीन स्थान तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सेव्ह एलिफंट फाउंडेशन एक थाय नॉन- प्रॉफिट संस्था आहे. ही संस्था थायलंडमध्ये बंदिस्थ असलेल्या हत्तींची देखभाल करतात.

वेळीच सावध व्हा, या 7 कारणांमुळे घरातून दूर जाईल लक्ष्मी!

पार्टनरमध्ये असतील हे गुण तर तुमच्यासाठी तो पूर्ण आहे ‘प्रामाणिक’

तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जांभया येतात तर व्हा सावधान!

शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...