Home /News /lifestyle /

Tihar Jail मध्ये कैद्याने गिळला Mobile; चिरफाड न करताच डॉक्टरांनी शरीरातून बाहेर काढला

Tihar Jail मध्ये कैद्याने गिळला Mobile; चिरफाड न करताच डॉक्टरांनी शरीरातून बाहेर काढला

तिहार जेलमधील कैद्याच्या शरीरातून डॉक्टरांनी सर्जरीशिवायच मोबाईल काढून दाखवला आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : तिहार जेल (Tihar Jail) , तिथं कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असतो. या जेलमध्ये एका कैद्याकडे मोबाईल (Mobile) सापडला आहे. धक्कादायक म्हणजे या कैद्याने आपला मोबाईल चक्क गिळला (Tihar jail prisoner swallowed mobile). अशा परिस्थितीत कमाल केली ती डॉक्टरांनी. कोणतीही सर्जरी, ऑपरेशन, चिरफाड न करताच त्यांनी या कैद्याच्या शरीरातून मोबाईल बाहेर काढला आहे (Doctor removed mobile from prisoner body without surgery). 5 जानेवारी 2022 ला तिहार जेल नंबर एकमधील कैद्याने एक मोबाईल फोन गिळला. कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्याचा तपास केला तेव्हा याबाबत खुलासा झाला. लगेच त्याला दिल्लीच्या दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जीबी पंत रुग्णालयात हलवण्यात आलं (GB Pant Hospital), अशी माहिती तुरुंग प्रशासनाने दिली. तिथं डॉक्टरांनी चिरफाड न करताच त्याच्या शरीरातून मोबाईल बाहेर काढला आहे. त्यांनी एन्डोस्कोपी पद्धतीची (Endoscopy Technic)  मदत घेतली. रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर सिद्धार्थ श्रीवास्तव आणि डॉ. मनीष तोमर यांनी सांगितलं, त्यांनी आतापर्यंत अशी जवळपास 10 प्रकरणं पाहिली आहेत. बहुतेक वेळा जेलमध्ये बंद असलेले कैदी कधी फोन तर कधी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मादक पदार्थांच्या पुड्या गिळतात. ते त्यांच्या शरीरातून ऑपरेशनशिवायच बाहेर काढले जातात. हे वाचा - आश्चर्य! 4 हात आणि 4 पाय; भारतात जन्माला आलं असं विचित्र बाळ; डॉक्टर म्हणाले... डॉ. सिद्धार्थ यांंनी सांगितलं, रुग्णाने मोबाईल गिळल्याचं जेव्हा समजलं तेव्हाच इन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. एन्डोस्कोपीमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात फोन कुठे आहे ते समजलं आणि मग एक वेगळा पाइप टाकून फोन हळूहळू खेचत बाहेर काढला. डॉक्टरांनी सांगितलं, अशी प्रकरणं खूप गुंतागुंतीची असतात. छोटीशी चूकसुद्धा रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. पोटातून कोणतीही जड वस्तू वरच्या दिशेने काढली जाते तेव्हा श्वास आणि अन्ननलिकेला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते. 50 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या वस्तूवेळी धोका तसा कमी असतो पण 100 ग्रॅम वजनाची वस्तू असेल तर धोका वाढतो. फोनचं वजन जवळपास 90 ते 100 ग्रॅम होतं. या दोन्ही नलिका नाजूक असतात. थोडा जरी स्पर्श झाला तरी त्यांना नुकसान पोहोचू शकतं आणि त्यानंतर त्या नीट करणं सोपं नाही. इतकं मोठं आव्हान असतानाही डॉक्टरांनी ते स्वीकारलं आणि जवळपास एक तासानंतर फोन त्यांनी शरीरातून बाहेर काढला. साडे सहा इंच लांब आणि तीन इंच रूंद अशा आकाराचा हा मोबाईल होता. हे वाचा - अरे देवा! आता अज्ञात आजाराचं संकट; थेट मेंदूवरच हल्ला करत स्मरणशक्ती करतोय गायब तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी सांगितलं की आता कैद्याची प्रकृती ठिक आहे. त्याच्याकडे मोबाईल कुठून आला हे माहिती नाही. याबाबत तपास सुरू आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Mobile

    पुढील बातम्या