Home /News /lifestyle /

टाइट जीन्समुळे प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम, वाढतोय वंध्यत्वाचा धोका

टाइट जीन्समुळे प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम, वाढतोय वंध्यत्वाचा धोका

टाइट जीन्सची (Tight jeans) घातल्याने पुरुषांच्या टेस्टिकल्समधील (testicles) शुक्राणूंचं प्रमाण कमी होतं, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    मुंबई, 02 मार्च : सध्या टाइट जीन्सची (Tight jeans) फॅशन आहे. मुलं, पुरुष स्टायलिश आणि हँडसम दिसावं यासाठी अशी फिट जीन्स घालतात. यावेळी तुम्ही फक्त कसं दिसता याचा विचार करता मात्र तुमच्या आरोग्याचा विशेषत: प्रजननसंबंधित आरोग्याचा विचार कधी केला आहे का? टाइट जिन्स घातल्याने पुरुषांच्या शुक्राणूंवर परिणाम होतो(Sperm). त्यांची संख्या कमी होतो. वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल मात्र ब्रिटनमध्ये याबाबत एक संशोधन झालं होतं. त्यामध्ये स्किन टाइट जीन्स घालणाऱ्या पुरुषांचा अभ्यास करण्यात आला. या पुरुषांच्या स्पर्मचं प्रमाण हळूहळू कमी झाल्याचं दिसलं. स्पर्मचं प्रमाण अति कमी झालं तर पुरुषांना वंध्यत्वही येऊ शकते. शिवाय टाइट जिन्समुळे एसटीडी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजचा धोकाही वाढतो, असं या संशोधनात दिसून आलं. हे वाचा -  गूड न्यूज ! आता स्त्रियांसाठीही आला Vigra; सुपरमॉडेलनं लाँच केला प्रोडक्ट औरंगाबादमधील डॉ. अमोल अन्नदाते यांनीही पुरुषांनी टाइट जिन्स घातल्याने काय होऊ शकतं, हे सांगितलं. डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितल्यानुसार, “डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितलं की, पुरुषांच्या गुप्तांगाचा भाग असलेल्या टेस्टिकल्स (testicles) शरीराच्या बाहेर असतात. याचं कारण म्हणजे या टेस्टीसमध्ये शुक्राणू तयार होतात आणि शुक्राणू नीट तयार होण्यासाठी या टेस्टीचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असायलं हवं. मात्र टाइट जिन्समुळे या टेस्टीचं तापमान वाढतं आणि त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते” हे वाचा - महिलांनो Vagina Discharge बाबत तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात खरंतर फक्त पुरुषच नव्हे तर महिलांनीही टाइट जीन्स घालू नये. दोघांनाही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आणि ब्लॅडरसंबंझित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी टाइट जीन्स घालणं सोडून द्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Jeans, Jeans pants, Sperm

    पुढील बातम्या