Home /News /lifestyle /

आपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली, रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO VIRAL

आपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली, रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO VIRAL

तोडानं पूर्ण ताकद लावून गाडी खेचणाऱ्या या वाघाचा (Tiger) व्हिडीओ (video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे.

    मुंबई, 16 जानेवारी : माणूस असो किंवा प्राणी (Animal) आपल्या विशिष्ठ जागेत किंवा मालकीच्या जागेत जर कुणी दुसरं आलं तर राग तर येणारंच. माणसं अशावेळी भांडणं करतात, वाद घालतात अगदी हाणामारीपर्यंतही पोहोचतात. पण प्राण्यांचं काय? प्राण्यांचंही एक विश्व असतं. जिथं त्यांना जगायचं असतं. पण अनेकदा माणसं तिथं अतिक्रमण करतात, घुसखोरी करतात किंवा आपली रहदारी वाढवतात. अशावेळी या मुक्या जीवांना काय करायचं. माणसांच्या भीतीनं या प्राण्यांना आपल्याच जागेत सैरावैरा पळावं लागतं. हिंसक प्राणी असल्यास माणलं त्या प्राण्याची शिकार होतात. सध्या अशाच एका वाघाचा (tiger) व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (viral) होतो आहे. ज्याला आपल्या एरिआत गाडी दिसताच त्याला राग येतो आणि त्यावेळी तो काय करतो ते तुम्हीच पाहा. रस्त्यावर गाडी पाहून वाघ चक्क ती गाडी खेचू लागतो. आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटरवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता. रस्त्यावर एक भलीमोठी कार उभी आहे. वाघ त्या कारच्या मागच्या बाजूला आपल्या तोंडात धरतो आणि ती कार खेचण्याचा प्रयत्न करतो. तो इतका जोर लावतो की ती कार मागे सरकते. किंगच्या या अशा वागणुकीवर प्रतिक्रिया देण्यासाठी सोशल मीडियावर पुरेसे लोक आहेत असं सुशांता यांनी म्हटलं आहे. हे वाचा - थुईथुई नाचणाऱ्या मोरानं घेतली उंच भरारी; डोळ्यांचं पारणं फेडणारा सुंदर VIDEO हा व्हिडीओ पाहून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. हा वाघ नेमकं काय करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तो असं का करतो आहे, असे बरेच प्रश्न नेटिझन्सना पडले आहेत. काहींच्या मते वाघाला त्याच्या एरिआत ही गाडी आल्याचं फारसं रूचलेलं नाही. आपणही व्हिडीओ पाहतो तेव्हा आपल्याही असंच वाटतं. ही कार दिसताच वाघाला राग आल्यासारखंच वाटतं. आपल्या ठिकाणात दुसऱ्या एखाद्या कुणीतही घुसखोरी केलेली त्याला अजिबात आवडलेली नाही हे दिसतं. तर काही जणांनी वाघाला ड्राइव्ह करायचं आहे असंही चेष्टेत म्हटलं आहे. हे वाचा - ऊस खायला दिला त्याच्याकडेच पाठ केली आणि... हत्तीचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही शिवाय काही लोकांना वाटतं वाघ त्या कारशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे, तर काहींनी त्याला भूक लागली असावी आणि खायला काही मिळालं नाही म्हणून कदाचित तो असं करत असावा, असं मत नोंदवलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Tiger, Viral, Viral videos

    पुढील बातम्या