मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Thyroid Medication: थायरॉईडची औषधं तुम्हीही घेताय? मग या गोष्टी सर्वात अगोदर जाणून घ्या

Thyroid Medication: थायरॉईडची औषधं तुम्हीही घेताय? मग या गोष्टी सर्वात अगोदर जाणून घ्या

Thyroid Medication : थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. जर एखादी व्यक्तीचं शरीर त्याच्या थायरॉईडच्या पातळीचं व्यवस्थापन करू शकत नसेल, तर ते हृदय आणि मज्जातंतूशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतं.

Thyroid Medication : थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. जर एखादी व्यक्तीचं शरीर त्याच्या थायरॉईडच्या पातळीचं व्यवस्थापन करू शकत नसेल, तर ते हृदय आणि मज्जातंतूशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतं.

Thyroid Medication : थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. जर एखादी व्यक्तीचं शरीर त्याच्या थायरॉईडच्या पातळीचं व्यवस्थापन करू शकत नसेल, तर ते हृदय आणि मज्जातंतूशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतं.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : बदलणाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळं आता लोकांमधील आजारांचा आलेख झपाट्यानं वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून थायरॉईडची (Thyroid) समस्याही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. थायरॉईडची समस्या वृद्धांबरोबरच तरुणांमध्येही दिसून येत आहे. खरं तर थायरॉईडचा आजार हार्मोन्सच्या असंतुलनामुळं उद्भवतो. या आजाराची वेळीच काळजी घेतली नाही तर शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. तुम्हाला थायरॉईडची समस्या असल्यास आणि तुमचं औषध सुरू करायचं असेल तर चांगल्या परिणामासाठी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणं (Thyroid Medication) आवश्यक आहे.

थायरॉईडचे (Thyroid) दोन प्रकार आहेत. जेव्हा थायरॉईड हार्मोन ग्रंथींमधून जास्त प्रमाणात स्रवतं, तेव्हा या समस्येला हायपरथायरॉईड म्हणतात. तर हार्मोनची पातळी कमी झाली असेल तर या समस्येला हायपोथायरॉईड म्हणतात. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. जर एखादी व्यक्तीचं शरीर त्याच्या थायरॉईडच्या पातळीचं व्यवस्थापन करू शकत नसेल, तर ते हृदय आणि मज्जातंतूशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतं.

औषध घेताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या बाबी

1. केव्हा घ्यावीत औषधं - कोणत्याही रोगाची औषधं सामान्यतः जेवणानंतरच घ्यावीत असं सांगितलं जातं. पण थायरॉईडच्या समस्येमुळं तुम्ही औषधं सुरू करत असाल तर, ही औषधं नेहमी रिकाम्या पोटी घ्यायची असतात हे लक्षात ठेवा. कारण जेवणानंतर थायरॉईडची औषधं घेतल्यास त्यांचा प्रभाव कमी होतो.

2. नियमितता - जर तुम्ही थायरॉईडच्या समस्येसाठी औषधं घेत असाल तर, ही औषधं नियमितपणे घेणं आवश्यक आहे. ते तुमची थायरॉईड पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ही औषधं ठराविक वेळेत घेणं अधिक फायदेशीर ठरतं. थायरॉईडची औषधं जेवणापूर्वी अर्धा तास ते एक तासापूर्वी घ्यावीत. जेणेकरून त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील असा सल्ला दिला जातो.

हे वाचा - Muscle Pain: हिवाळ्यात शरीराच्या या अवयवांमध्ये होतात सतत वेदना; हे उपाय ठरतील गुणकारी

3. साध्या पाण्यासह घ्यावीत औषधं - तज्ज्ञ डॉक्टर औषधं घेण्याचे वेगवेगळे मार्ग सुचवतात. थायरॉईडचं औषध घेत असाल तर ते साध्या पाण्यासोबत घ्यावं. चहा किंवा कॉफीसोबत औषध घेतल्यानं त्याचा परिणाम कमी होऊ शकतो.

हे वाचा - Kitchen Tips: मळलेलं पीठ जास्त काळ राहील एकदम मऊसूत; या सोप्या ट्रिक्स वापरून पहा

4. औषधं – थायरॉईडव्यतिरिक्त इतर कोणत्याही आजारासाठी औषधं घेत असाल तर, या वेळी थायरॉईडच्या औषधासोबत इतर कोणत्याही आजाराचं औषध घेऊ नये, याची विशेष काळजी घ्या. जरी तुम्हाला सकाळी कोणतंही सप्लिमेंट घ्यायचं असेल तरी थायरॉईडवरची औषधं घेणं आणि सप्लिमेंट घेणं यामध्ये सुमारे एक तासाचं अंतर ठेवा. जर तुम्हाला दोनपेक्षा जास्त औषधं घ्यावी लागत असतील आणि तुम्हाला काही संभ्रम असेल तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं.

First published:

Tags: Health, Health Tips