डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

हा आजार दिसायला छोटासा असला तरी त्याचा त्रास जास्त असतो. पण घरगुती उपायांनी या त्रासापासून अगदी कमी वेळात आराम मिळेल.

  • Share this:

बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. सर्दी, खोकला तसेच घशात खवखवणं असे त्रास होऊ लागतात. त्यातही घशात खवखव होत असेल तर कुठेच लक्ष लागत नाही. हा आजार दिसायला छोटासा असला तरी त्याचा त्रास जास्त असतो. पण घरगुती उपायांनी या त्रासापासून अगदी कमी वेळात आराम मिळेल.

घशातील खवखव दूर करण्यासाठी तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता. तुळस, लवंग, काळी मिरी आणि आलं घातलेला गरम चहा प्यायल्यास घशाला आराम मिळतो. या सर्व गोष्टी गरम असतातच शिवाय या सर्वात अँटी बॅक्टेरियल गुणधर्मही आहेत. याचमुळे हर्बल चहा तब्येतीसाठी उपयोगी मानली जाते.

चहा प्यायला आवडत नसेल तर नुसत्या काळ्या मिरीचं सेवन केल्यानेही घशाला आराम मिळतो. बत्ताशाच्या आत काळी मिरी ठेवून तुम्ही ती खाऊ शकता. बताशा आणि काळी मिरीमुळे घशाची खवखव निघून जाते आणि घशाला आराम मिळतो.

याशिवाय लसूण खाल्ल्यानेही घशाला आराम मिळतो. लसूणमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात यामुळे घशाचे अनेक आजार दूर होतात. लसूणची एक कळी खाल्ली तरी तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. याशिवाय कोमट पाण्यात मीठ टाकून त्याने गुळण्या केल्यानेही घशाला आराम मिळतो. लसणाप्रमाणे मिठातही अँटी बॅक्टेरियल गूण असतात. गरम पाण्यामुळे घशाला शेक मिळतो आणि त्रास कमी होतो.

हळदीचं दूध प्यायल्याने फक्त घशालाच आऱाम मिळतो असं नाही तर संपूर्ण शरीरासाठी याचा फायदा होतं. निरोगी आरोग्यासाठी हळदीचं दूध नियमितपणे पिणं केव्हाही योग्य.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 01:52 PM IST

ताज्या बातम्या