Home /News /lifestyle /

घसा खवखवतोय का? दुर्लक्ष करू नका ! संशोधनामधून 'ही' माहिती उघड

घसा खवखवतोय का? दुर्लक्ष करू नका ! संशोधनामधून 'ही' माहिती उघड

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 15 हजार 399 एवढी झाली आहे.

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 15 हजार 399 एवढी झाली आहे.

घसा खवखवणं (throat Infection) हे कोरोना (Corona)चं लक्षण असल्याची माहिती संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे तुमचा घसा खवखवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

    मुंबई, 14 ऑक्टोबर: कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. मागील सहा महिन्यांमध्ये लाखो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराची विविध लक्षणं समोर आली आहेत. अजूनही वेगवेगळी लक्षणं समोर येत आहेत.यामध्ये घसा खवखवणं हे कोरोनाचं लक्षण आहे की नाही हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. सहा महिन्यांच्या या कोरोनाच्या कालावधीत कोरोनाचं संकट अतिशय वेगानं पसरलं आहे. दररोज हजारो रुग्णांची त्यात भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराची विविध लक्षणं समोर आणली असून घसा खवखवणं देखील यामधील एक लक्षण आहे. पण खरंच घसा खवखवण्याचा कोरोनाशी संबंधित आहे का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतंच चीनमध्ये केलेल्या अभ्यासात 55 हजार रुग्णांपैकी केवळ 14 टक्के कोरोना रुग्णांमध्ये घसा खवखवणं हे लक्षण आढळून आलं. अमेरिकेतील Centres for Disease Control and Prevention च्या म्हणण्यानुसार प्रत्येक रुग्णाचे शरीर वेगळे आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी लक्षणे आढळून येतात. त्यामुळे घसा खवखवणं प्रत्येक रुग्णामध्ये आढळून येत नाही. त्याचबरोबर घसा खवखवणं म्हणजे केवळ कोरोना पॉझिटिव्ह असणं असं होत नाही. यामध्ये तुम्हाला इतर आजार असला तरीही तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात.यामध्ये थंडी, ताप, टॉन्सिल्स यासारख्या आजारामुळे देखील घशामध्ये खवखव जाणवते. खोकला हा सामान्य आजार असून कोरोनाचा काही संबंध नसल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या फोटोंवर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात येत आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोरोनाची इतर कोणतीही लक्षणं किती तीव्रपणे जाणवत असतील, तर तुम्हाला टेस्ट करायला हवी. कोरोनाची काही सामान्य लक्षणं समोर आली आहेत. यामध्ये ताप, खोकला आणि थकवा यांसारखी लक्षणं दिसून येतात. त्याचबरोबर जर इतर लक्षणांबरोबर तुम्हाला घसा खवखवणं हे लक्षण देखील दिसूनआलं तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि शक्य असेल तर चाचणी करून घा ! कारण कोरोनाच्या काळात कोणताही आजार अंगावर काढणं घातक ठरू शकतं.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या