दररोज पहाटे चार वाजता ते सायकल चालवायला सुरुवात करत, साधारण अकरा वाजता ठरवलेल्या ठिकाणी भेटत. स्थानिक रेस्टॉरंटस, टपऱ्या, हॉटेल अशा ठिकाणी थांबून खाणंपिणं करून काम करत आणि मग संध्याकाळी पुढे जात असा आमचा दिनक्रम होता. दरम्यान, सायकलवर त्यांच्या लॅपटॉपचंही ओझं असल्यानं थोडा त्रास झाला, अशी माहिती बेकन यानं दिली. अशा काही अडचणींचा सामना करत हा प्रवास पूर्ण करणं आव्हानात्मक होतं, पण त्याचं सार्थक झालं. सायकलिंगमुळं (Cycling) स्वातंत्र्यही मिळालं आणि वेगळा रोमांचक अनुभवही घेता आला, असंही बेकन यानं सांगितलं.
हे देखील वाचा - माझ्या नाटकाचे प्रेक्षक वडिलांच्या टॅक्सीतून आले होते तेव्हा...' भरत जाधवने शेअर केली इमोशनल FB पोस्ट दररोज साधारण 80 किलोमीटरचं अंतर ते पार करत. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी जास्त अंतर कापत, सुरुवातीला दोन दिवस हे रुटीन अवघड वाटतं होतं, नंतर मग त्याची सवय झाली, असं ओल्विन यानं सांगितलं. या प्रवासात त्यांना अडचणीही आल्या. कोविड 19च्या निर्बंधामुळे अनेक ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणं कठीण गेलं. याशिवाय फार मोठया अडचणी त्यांना आल्या नाहीत, त्यामुळं प्रत्येकी 25 हजार रुपये खर्चात त्यांची ही सहल पार पडली. या तिघांच्या कामाच्या ठिकाणच्या वरिष्ठांनीही त्यांच्या या साहसी प्रवासासाठी पाठिंबा दिला. अर्थातच कामावर याचा काहीही परिणाम होऊ न देण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी दिली होतीच. रतीशच्या मते, या प्रवासामुळे वेगळ्या जीवनशैलीचा अनुभव घेता आला. सायकल चालवण्यात त्यांचा बराच वेळ जात असला तरी आजूबाजूच्या गोष्टींचा आस्वाद घेण्याचा, नवीन प्रदेश, तिथली संस्कृती या सगळ्याचा अनुभव त्यांना घेता आला. ही या सगळ्यातील सुंदर बाब आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.