यापुढे आयडियाजवर काम करणाऱ्यांनाच मिळेल नोकरीची संधी

यापुढे आयडियाजवर काम करणाऱ्यांनाच मिळेल नोकरीची संधी

पूर्वी कंपन्यांची आवश्यकता म्हणून याकडे पाहिलं जात होतं, मात्र आता काळ बदलला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे : यशस्वी कर्मचारी ते नाहीत ज्यांनी एखादं कौशल्य मिळविण्यासाठी अनेक वर्षे घालवली. स्पर्धेच्या या युगात कंपन्या अशा कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करातात, जे आपल्या करिअरमध्ये नवीन कल्पना आणि कौशल्यांवर म्हणजेच आयडियाजवर काम करतात.

पूर्वी कंपन्यांची आवश्यकता म्हणून नवीन कल्पना आणि कौशल्य शिकण्यावर भर दिला जात होता. मात्र, आता काळ बदलला असून, कर्मचारी स्वतःच आपल्या क्षमात वाढविण्यासाठी प्रयत्न करताहेत. कंपनीचं उत्पादन वाढविण्यासाठी उत्तम सेवा देण्याकडे त्यांचा कल आहे. जॉब मार्केटमधली ही स्थिती बदलण्यास टेक्नॉलॉजी सर्वात जास्त कारणीभूत आहे. त्यामुळे नवनवीन कल्पनांवर आणि कौशल्यांवर काम करणाऱ्या तरुणांसाठीच भविष्यात भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध राहतील, असं तज्ज्ञांच मत आहे.

नियमित व्यायाम केल्याने मेंदू होतो तल्लख; अशी वाढवा कार्यक्षमता

स्वतःमध्ये बदल घडवून आणा - ज्यांना स्वतःतचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, त्यांनी कोणत्याही गोष्टीची वाट न पाहता स्वतःमध्ये बदल करायला. अर्धवेळ प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आपला जॉब करतानाही तुमचं कौशल्य वाढवू शकता. असे अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन रिसोर्सेस आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आपल्या कल्पनांचा आणि कौशल्यांचा विस्तार करू शकता. सुरू असलेल्या जॉबबरोबर एखादा साईड जॉ़ब करूनसुद्धा तुम्ही आपली कल्पनाशक्ती आणि कौशल्ये स्ट्राँग करू शकता.

तुमची झोप अपुरी राहते का? वाचा 'हे' दुष्परिणाम

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा - बहुतांश कंपन्या अनुभवी उमेद्वारांना प्रथम प्राधान्य देतात. यातून तुम्ही एक चांगले अनुभवी आणि सांघिक खेळाडू आहात हे स्पष्ट होतं. या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल. असं केलं तरच तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.

गॉडफॉदर निवडा - प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी गॉडफॉदर म्हणजेच योग्य सल्लागार व्यक्ती असायला हवी. त्यासाठी तुम्हाला भरपूर अनुभवी आणि उत्साही व्यक्ती शोधावी लागेल. जर तुम्ही एखादा जॉब करता असाल तर त्याठिकाणी तुम्ही असा सल्लागार शोधा, जो कल्पना आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी तुमची मदत करेल, आणि त्यांचा विस्तार करेल.

First published: May 26, 2019, 5:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading