मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Coronavirus : वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांना कोरोनामध्ये होतो असाही लाभ; नवीन संशोधनाचे निष्कर्ष

Coronavirus : वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांना कोरोनामध्ये होतो असाही लाभ; नवीन संशोधनाचे निष्कर्ष

Weight losers are less prone to complications of Covid : वजन कमी करण्यासाठी पाचन तंत्राच्या शस्त्रक्रियेला बॅरिएट्रिक सर्जरी (Bariatric surgery) म्हणतात. वास्तविक, लठ्ठपणामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि सूज येणे, हृदयरोग, रक्ताच्या गुठळ्या आणि फुफ्फुसांशी संबंधित गुंतागुंती होण्याचा धोका वाढतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 जानेवारी: कोरोनाच्या (Coronavirus) काळात आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या आणि आधीच बीपी किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. वाढत्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे (Obesity) मधुमेह आणि बीपीसारखे आजार शरीरात वाढत जातात. म्हणूनच डॉक्टर नेहमी नियमित व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करण्याचा सल्ला देतात. ज्या लोकांना लठ्ठपणा खूप असतो, त्यांच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया होतात. आता यूएस स्थित क्लीव्हलँड क्लिनिकने (Cleveland Clinic) केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जे शस्त्रक्रियेद्वारे लक्षणीय वजन कमी करतात त्यांना कोविड-19 शी संबंधित गुंतागुंतीचे आजार होण्याचा धोका कमी असतो. वजन कमी करण्यासाठी पाचन तंत्राच्या शस्त्रक्रियेला बॅरिएट्रिक सर्जरी (Bariatric surgery) म्हणतात. वास्तविक, लठ्ठपणामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि सूज येणे, हृदयरोग, रक्ताच्या गुठळ्या आणि फुफ्फुसांशी संबंधित गुंतागुंती होण्याचा धोका वाढतो. या अभ्यासाचे निष्कर्ष जेएएमए (JAMA Surgery) जर्नलमध्ये प्रकाशित (Weight losers are less prone to complications of Covid) झाले आहेत.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. अली अमिनियन म्हणतात, 'लठ्ठपणामुळे ज्या लोकांनी संसर्गापूर्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी केले, त्यांच्यात कोरोनाशी संबंधित गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका 60 टक्क्यांनी कमी झाला.' तसेच यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास गुंतागुंतही वाढते.

हे वाचा - भय्यू महाराजांनी कसं बदललं कालीचरण महाराजांचं आयुष्य, ‘एक रुद्राक्षाची माळ आणि…’

अभ्यास कसा झाला?

लठ्ठपणा असलेल्या एकूण 20,212 प्रौढ रुग्णांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता. 5,053 लोकांचा एक गट तयार करण्यात आला ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 35 आणि त्याहून अधिक होता आणि त्यांच्यावर 2004-17 दरम्यान बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया झालेली होती.

हे वाचा - Shape wear : स्लीम दिसण्यासाठी तुम्हीही शेप वेअर वापरताय? हे परिणाम आधी वाचून घ्या

संशोधकांना असे आढळून आले की, ज्यांनी संसर्ग होण्यापूर्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 49 टक्के कमी, उपचारांसाठी ऑक्सिजनची गरज 63 टक्के कमी आणि कोविडची गंभीर लक्षणे दिसण्याचा धोका 60 टक्के कमी आहे.

First published:

Tags: Coronavirus, Health, Lifestyle, Weight, Weight loss