• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • फळं-भाज्या खाणारी मुलं बोलण्यात असतात तरबेज

फळं-भाज्या खाणारी मुलं बोलण्यात असतात तरबेज

अशावेळी नागरिकांनी काय खावं आणि काय टाळावं याबाबत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

अशावेळी नागरिकांनी काय खावं आणि काय टाळावं याबाबत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

संशोधनात असं दिसून आलं आहे.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  मुलं नेहमीच आई-बाबांकडून ऐकत असतात मोठा झाला आहे सर्व भाज्या खायला हव्यात. ते बरोबरच सांगतात पण कदाचित त्यांना पण माहिती नसेल की भाज्या खाल्ल्याने बोलण्याची क्षमता सुधारते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, जास्त भाज्या आणि फळ खाल्ल्याने मुले बोलण्यात तरबेज होतात. बोलण्यातील तल्लखता म्हणजे स्मरणशक्तीकडून सूचना मिळवण्याची क्षमता. मुलांना फळे आणि भाज्यांनी हा मोठा फायदा होतो. एका संशोधनातून असे दिसून आले की, ज्या लोकांनी जास्त भाज्या, फळे, सुकामेवा, डाळी यांचे सेवन केले होते त्यांचा बोलण्याच्या वर्बल फ्लुएंसी टेस्टचा स्कोर जास्त होता. या अभ्यासामध्ये 45 ते 85 वर्ष वयोगटातील कॅनडाच्या नागरिकांचा समावेश केला होता. यात वर्बल फ्लुएंसीशी संबंधित कारणांची तपासणी करण्यात आली. वर्बल फ्लुएंसी टेस्टमध्ये प्रत्येक व्यक्तीला एका मिनिटात जास्तीत जास्त शब्द बोलण्यास सांगितले गेले. जर्नल ऑफ न्यूट्रीशन हेल्थ एंड एजिंग मध्ये प्रकाशित या संशोधनात 8574 लोकांनी भाग घेतला होता. त्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यात 1126 परदेशी होते जे 20 वर्षापूर्वी कॅनडामध्ये आले होते. कुणालाही विसरण्याचा आजार नव्हता. त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. एक होती कंट्रोल्ड ओरल वर्ड एसोसिएशन टेस्ट ज्यात त्यांना एक शब्द सांगण्यात आला आणि त्यांना त्याच्याशी संबंधित मनात तत्काळ येणारा पहिला शब्द सांगायचा होता. दुसरी चाचणी होती, अॅनिमल फ्लुएंसी टेस्ट यात त्यांना एका मिनिटात जास्तीत जास्त प्राण्यांची नावे सांगायची होती. हे वाचा - जीवनशैलीत फक्त हे 10 बदल; कोरोना काळात महिलांना निरोगी ठेवण्यासाठी करतील मदत संशोधकांना असे आढळून आले की फळे आणि भाज्या खाण्याच्या टक्केवारी आणि वाढता वर्बल स्कोर यांचा परस्परांशी संबंध होता. सगळ्यात चांगले परिणाम त्यांच्यात दिसून आले जे रोज 6 वेळा खात होते. आहाराशिवाय त्यांची स्थान परिवर्तनाची स्थिती, वय, रक्तदाब, लठ्ठपणा आणि शरीरातील मेदाचे प्रमाणही तपासण्यात आले. असाही एक अभ्यास करण्यात आला ज्या प्रौढांना कमी भूक लागत होती किंवा जे कमी गुणवत्तेचा आहार घेतात त्यांना कुपोषण असू शकते. कुपोषणाचे आकलन करण्यासाठी ग्रिप स्ट्रेंथचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे या अभ्यासात ज्यांची पकड कमजोर होती त्यांच्यात वर्बल फ्लुएंसी कमी होती. आहारात ळं आणि भाज्या गरजेच्या myUpchar.com चे डॉ. आयुष पांडे म्हणाले, शरीराला निरनिराळ्या जीवनसत्व आणि क्षारांची गरज असते. हे जीवनसत्व आणि क्षार आपल्या शरीराचा विकास करत आणि आजारांना दूर ठेवतात. त्यांना सूक्ष्म पोषक द्रव्ये समजले जाते. ते शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत नाहीत, म्हणून त्यांना आहारातून घ्यायला हवे. myUpchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अनुराग शाही यांच्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पोषक द्रव्य जसे प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, मेद, जीवनसत्व आणि क्षार यांचे प्रमाण योग्य नसते तेव्हा ती व्यक्ती कुपोषित होते. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सकस आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: