मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रयोगशील शेतकऱ्यानं शेतात पिकवला चक्क काळा गहू, काय आहे प्रकार? जाणून घ्या फायदे

प्रयोगशील शेतकऱ्यानं शेतात पिकवला चक्क काळा गहू, काय आहे प्रकार? जाणून घ्या फायदे

शेतीत नवे प्रयोग करणारे शेतकरी नेहमीच कौतुकाचा विषय बनतात. गुजरातेतील एका शेतकऱ्यानंही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शेतीत नवे प्रयोग करणारे शेतकरी नेहमीच कौतुकाचा विषय बनतात. गुजरातेतील एका शेतकऱ्यानंही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शेतीत नवे प्रयोग करणारे शेतकरी नेहमीच कौतुकाचा विषय बनतात. गुजरातेतील एका शेतकऱ्यानंही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  मेहसाणा, 18 जानेवारी : गुजरातमध्ये (Gujarat) मेहसाणा (Mehsana) जिल्ह्यातील नंदासन गावच्या एका तरुण आणि उत्साही शेतकऱ्यानं (farmer) एक नवा आणि यशस्वी प्रयोग (experiment) केला आहे. त्याच्या या प्रयोगशीलतेची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.

  या शेतकऱ्याचं नाव आहे विपुल पटेल. या विपुलनं आपल्या शेतात चक्क काळा गहू पिकवला (cultivate) आहे. यामागची कथा अशी, की विपुलनं एकदा बसल्या-बसल्या इंटरनेटवर (internet) सर्च मारला. त्यात त्याला कळालं, की गुजरातेत काळ्या गव्हाची (black wheat) शेती खूपच कमी केली जाते. यात त्याला हेसुद्धा माहीत झालं, की हा गहू खाण्याचे अनेक शारीरिक फायदेही आहेत.

  काळ्या गव्हामध्ये अँथोसायनिन नावाचं एक रंगद्रव्य (pigment) असतं. सामान्य गव्हात हे रंगद्रव्य केवळ पाच पीपीएम इतकं असतं मात्र काळ्या गव्हात हे जवळपास 100 ते 200 पीपीएम इतकं असतं. अँथोसायनिन व्यतिरिक्त काळ्या गव्हात जस्त आणि लोहाचं प्रमाणही चांगलं असतं. काळ्या गव्हाच्या तुलनेत सामान्य गव्हामध्ये 60 टक्के जास्त लोह (iron) असतं. कृषी तज्ञ सांगतात, की हा गहू काळा असला तरी याची चपाती चांगली बनते.

  हा काळा गहू खाण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय याच्या उत्पादनामध्ये याची किंमत  अजूनच वाढते. या गव्हाचं बियाणं 2500 ते 3000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सामान्य गहू उत्पन्नानंतर 300 ते 400 रुपयात विकले जातात. या काळ्या गव्हाला मागणी अधिक असल्यानं त्यांची विक्री 1300 ते 1500 रुपये प्रती 20 किलो इतक्या चढ्या भावानं होते. अशाप्रकारे उत्पादनानंतरही किंमत जितकी चांगली असेल, तितकंच त्यापासून मिळणारं उत्पन्नही (income)अधिक असेल.

  विपुल पटेलचं हे काळ्या गव्हाचं शेत पाहण्यासाठी लोक दूरदूरून येत आहेत. त्याच्या या प्रयोगातून अनेकांना प्रेरणा मिळते आहे.

  First published:

  Tags: Farmer, Gujrat