Home /News /lifestyle /

गुरु पौर्णिमा 2022 : गुरुपौर्णिमेला 4 राजयोग; ही कामं करताच जीवनातील अडथळे होतील दूर

गुरु पौर्णिमा 2022 : गुरुपौर्णिमेला 4 राजयोग; ही कामं करताच जीवनातील अडथळे होतील दूर

जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी काही व्यक्तींसाठी हा दिवस खूप फलदायी ठरणार आहे.

    नवी दिल्ली, 5 जुले : भारतात इतर सणांप्रमाणे गुरुपौर्णिमेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या वर्षी गुरुपौर्णिमा 13 जुलै 2022 रोजी साजरी होत आहे. या दिवशी ग्रह-नक्षत्रांची स्थिती विशेष राहील. जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी काही व्यक्तींसाठी हा दिवस खूप फलदायी ठरणार आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूची पूजा करतो, त्यांना भेट देऊन त्यांचे शुभाशिर्वाद घेतो. महाभारत हा महान ग्रंथ लिहिणाऱ्या महर्षी वेद व्यास यांची या दिवशी पूजा केली जाते म्हणूनच या दिवसाला व्यासपौर्णिमाही म्हणतात त्याचमुळे ती गुरुपौर्णिमा मानली जाते. आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. याच दिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी अनेक जण आपल्या इष्ट देवांना गुरू मानून त्यांची पूजा करतात. यंदाच्या गुरुपौर्णिमेला 4 शुभ योग 13 जुलै या दिवशी साजऱ्या होणाऱ्या गुरु पौर्णिमेला ग्रह-नक्षत्रांची स्थिती उत्तम राहणार आहे. या दिवशी मंगळ, बुध, गुरू आणि शनी या चार ग्रहांच्या स्थितीमुळे रुचक, भद्र, हंस आणि शश या नावाचे 4 राजयोग तयार होणार आहेत. हा अतिशय चांगला योगायाग मानला जात आहे. याशिवाय मिथुन राशीतील सूर्य-बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग होत आहे. बुधादित्य योगात गुरुपौर्णिमा साजरी होण्याचा प्रसंग बऱ्‍याच वर्षांनंतर आला आहे. हा योगायोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी गुरूपौर्णिमेला हे करा उपाय गुरुपौर्णिमेच्यादिवशी अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे या दिवशी केली जाणारी पूजाअर्चा अधिक फलदायी ठरणार आहे. आपल्यावर गुरूंची कृपा व्हावी व कुंडलीतील गुरु ग्रह अधिक मजबूत व्हावा यासाठी पूजा अवश्य करायला हवी. ज्या व्यक्तींच्या आयुष्यात अनंत अडचणी येत आहेत. होणाऱ्या कामात अडथळे येत आहेत. लग्न कार्य होत नाही, अशांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरू ग्रहाची पूजा करायला हवी. यामुळे लवकर त्यांना याचं फळ मिळू शकेल. दरम्यान, भारतामध्ये गुरु-शिष्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. गुरू आपणाला समाजातील चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतो व वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी सतत मार्गदर्शन करत असतो. गुरूशिष्य परंपरा आपल्याला भारताव्यतिरीक्त इतर कुठेही पाहायला मिळत नाही. ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणारे अनेकजण या दिवशी ग्रहांची स्थिती पाहून महत्त्वाचे कार्यसिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न करत असतात.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Guru purnima

    पुढील बातम्या