मुंबई, 29 जून : रोजच्या कामातून आपण आपले आरोग्य चांगले राहील, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: हृदयाची अधिक काळजी घेण्याची वेळ आहे, कारण अलिकडे फार कमी वयात तरुणांना-मुलांनासुद्धा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. हृदय कमकुवत होतं तेव्हा स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशा स्थितीत आपल्याला अनेक प्रकारचे मोठे आजारही जडायला लागतात. उच्च रक्तदाबाची समस्या असो किंवा श्वास घेण्यात अडचण असो. अशा परिस्थितीत तुमच्या शरीरासाठी निरोगी हृदय असणे खूप महत्वाचे आहे. जाणून घेऊया हृदय कमकुवत झाल्याचे (Heart Week Sign) कसे ओळखावे.
उच्च रक्तदाब असणे -
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, काही लोकांना बीपीचा त्रास कायम असतो. बीपीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कधीच निष्काळजीपणा करू नये. कारण, बीपीता त्रास होणं हे लक्षण देखील कमकुवत हृदयाचे आहे. वास्तविक, जेव्हा आपले हृदय कमकुवत होते तेव्हाच बीपीचा त्रास होण्यास सुरुवात झालेली असते.
हे वाचा -
पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार
खांदा आणि छाती दुखणे -
काही लोकांमध्ये पाच-दहा मिनिटे छातीत आणि खांदे दुखत राहतात, हा प्रकार दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कोणत्याही वेगळ्या शारीरिक अॅक्टिविटी न करता आपोआप असे होत असल्यास काळजी घ्यावी. हे अटॅक येण्याचेही लक्षण असू शकते. याबाबत शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण असा त्रास नॉर्मलही असू शकतो किंवा हृदय कमकुवत झाल्याचेही ते लक्षण असू शकते.
हे वाचा -
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
घोरणे आणि झोपेच्या समस्या -
काही लोकांना घोरणे आणि झोपेशी संबंधित समस्या असतात. याला कित्येक लोक फारसं महत्त्व देत नाहीत, उपचार घेत नाहीत, मात्र हृदय कमकुवत झाल्याचे हे लक्षण असू शकते. अशा स्थितीत सतर्क राहावे लागेल, आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांना एकदा याबाबत माहिती द्यावी.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.