या उन्हाळ्यात AC शिवाय घर 'असं' ठेवा थंड

आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगतोय, ज्यामुळे तुम्ही तुमचं विजेचं बिल न वाढवता घर थंड ठेवू शकाल.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 06:43 PM IST

या उन्हाळ्यात AC शिवाय घर 'असं' ठेवा थंड

मुंबई, 28 मे : सगळीकडे उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. घराबाहेर पडलं नाही तरीही उकाड्यानं जीव हैराण होऊन जातो. याला पर्याय म्हणजे एसी, असं सगळ्यांना वाटतं. एसीमुळे विजेचं बिलही जास्त येतं. मग घर थंड कसं ठेवायचं?  विशेष म्हणजे दुपारच्या वेळी थंडाव्याची जास्त गरज असते. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगतोय, ज्यामुळे तुम्ही तुमचं विजेचं बिल न वाढवता घर थंड ठेवू शकाल.

तुमचा कोरडा एअर कण्डिशनर बनवा - पंख्याखाली एका भांड्यात बर्फाचे तुकडे ठेवा. यामुळे रुममध्ये थंड हवा खेळती राहील.

HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या

खिडक्या बंद करा - 30 टक्के उष्णता उघड्या खिडक्यांतून येते. त्यामुळे सकाळी उशिरा खिडक्या बंद करा, त्या संध्याकाळी उघडा. घरातली उष्णता नक्की कमी होईल.

ओले पडदे लावा - दारावरचा आणि खिडकीवरचा पडदा पाण्यानं ओला करा. त्यानं तापमानात खूप फरक पडेल.

Loading...

कामाच्या अतिताणानं Burn Out झालात? ही थकावट नव्हे तर आजारच - WHO ने घेतली दखल

इजिप्तशियनसारखे झोपा - तुम्हाला ही ट्रिक माहीत असेल. झोपताना तुम्ही पांघरुण घेता. त्यावर एक हलकं पांघरुण ओलं करून घ्या आणि मग झोपा. एकदम रिलॅक्स वाटेल.

अनप्लग्ड - घरात कुठलंही इन्स्ट्रुमेंट प्लग्ड केलं असेल आणि वापरत नसाल तर ते अनप्लग्ड करा. कारण प्लग्ड केलेल्या इन्स्ट्रुमेंटमधून, जरी ते बंद असलं तरी त्यातून उष्णता बाहेर पडते.

विदर्भात सूर्य आग ओकतोय, तापमान 20 वर्षात सगळ्यात जास्त

हे सगळे उपाय केलेत तर तुमचं घर एकदम थंड राहील. तुम्हाला एअर कण्डिशनरची गरजही लागणार नाही. खर्च कमी होईल. तेव्हा आता या उष्णतेला तोंड द्यायला तुम्ही सज्ज व्हा.


VIDEO: कहर! नागपुरात उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावरचं डांबरही वितळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: coolsummer
First Published: May 28, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...