मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कित्येक आजारांपासून संरक्षण देतं हे खास तेल; जाणून घ्या महत्त्वाचे 5 फायदे

कित्येक आजारांपासून संरक्षण देतं हे खास तेल; जाणून घ्या महत्त्वाचे 5 फायदे

संशोधनानुसार, माशांमध्ये असलेली पोषक तत्त्वं हिवाळ्यात अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतात. तुम्ही आहारात फिश ऑइलचा (fish oil) समावेश केला तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : हिवाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. या ऋतूमध्ये आपण आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात चांगल्या फॅटचा (good fat) समावेश करावा. हे सर्दी आणि फ्लूसारख्या (cold and flu) आजारांपासून तुमचं संरक्षण करेल.

एका अभ्यासानुसार, माशांमध्ये असलेली पोषक तत्त्वं हिवाळ्यात अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतात. तुम्ही आहारात फिश ऑइलचा (fish oil) समावेश केला तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

'झी न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, माशांमध्ये असलेलं ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स (Omega-3 polyunsaturated fatty acids) तुम्हाला पोषण देण्यासह तुमचे जैविक कार्य देखील सुधारते. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात फिश ऑइलचा समावेश करावा.

हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर

हृदयाच्या आरोग्यासाठी

आहारात फिश ऑइलचा अगदी कमी प्रमाणात जरी समावेश केला तरी तुमचं हृदय निरोगी राहील. अभ्यासानुसार जे लोक मासे खातात. त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. ओमेगा -3 पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् (PUFAs - Omega-3 polyunsaturated fatty acids) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करतात. यामुळं शरीरातील चांगलं कोलेस्टेरॉल वाढतं आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.

डोळ्यांसाठी

फिश ऑइलमध्ये असलेलं DHA (Docosahexaenoic Acid) दृष्टी चांगली ठेवतं. यामुळे दृष्टी चांगली राहते. डोळ्याच्या रेटिनामध्ये DHA नैसर्गिकरित्या असते. फिश ऑइलमध्ये आढळणारा DHA रेटिनल फंक्शन सुधारतो. डोळ्यांशी संबंधित आजारांमध्येही याचे सेवन फायदेशीर ठरते.

मेंदूच्या कार्यासाठी

फिश ऑइलमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. हे तुमच्या मेंदूचे कार्य सुधारते. तज्ञांच्या मते, Eicosapentaenoic Acid (EPA) आणि Docosahexaenoic Acid (DHA) ही ओमेगा-3 फॅटी अ‌ॅसिड आहेत. ते ह्रदयाचं रक्ताभिसरण वाढवतात आणि मेंदूच्या आरोग्यही चांगलं ठेवण्यास मदत करतात.

त्वचेसाठी

फिश ऑइलचं नियमित सेवन केल्यानं त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होते. याच्यामुळं त्वचा निरोगी राहते. तसंच त्वचेचं नुकसान होण्यापासून रोखलं जातं.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

सांधेदुखी आणि केसगळतीसाठी फायदेशीर

सांधेदुखी आणि केसगळतीच्या समस्येतही फिश ऑइलचं सेवन केल्यास फायदा होईल. जर तुम्ही हिवाळ्यात कोरडे झालेले केस (dry hair in winter) आणि कोरड्या त्वचेच्या (dry skin in winter) समस्येनं त्रस्त असाल तर आहारात फिश ऑइलचा समावेश करा. यामुळं गुडघेदुखीमध्येही आराम मिळेल.

First published:

Tags: Health, Health Tips