मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय सांगता! Chewing Gum खाऊन कमी होतो Corona चा धोका; संशोधकांचा दावा

काय सांगता! Chewing Gum खाऊन कमी होतो Corona चा धोका; संशोधकांचा दावा

यामुळे लाळेतील विषाणूंचे प्रमाण मर्यादित राहते आणि रोगाचा प्रसार कमी होतो. जेव्हा संक्रमित लोक बोलतात, श्वास घेतात किंवा खोकतात तेव्हा रोग पसरण्याचा धोका असतो, मात्र हे च्युइंगम हे संक्रमण रोखते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : एका विशिष्ट प्रकारचे च्युइंगम (Chewing Gum) तुम्हाला कोविड (COVID-19) च्या धोक्यापासून वाचवू शकते. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, या च्युइंगममुळे तोंडात कोविड कणांपैकी 95 टक्के कण अडकले जातात. ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात मदत होते. याबाबत झी न्यूजने बातमी दिली आहे.

विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत

एका अभ्यासानुसार, हे च्युइंगम जणू जाळ्यासारखे काम करते आणि कोरोना विषाणूच्या कणांना अडकवण्याचे काम करते. यामुळे लाळेतील विषाणूंचे प्रमाण मर्यादित राहते आणि रोगाचा प्रसार कमी होतो. जेव्हा संक्रमित लोक बोलतात, श्वास घेतात किंवा खोकतात तेव्हा रोग पसरण्याचा धोका असतो, मात्र हे च्युइंगम हे संक्रमण रोखते.

या स्पेशल च्युइंगममध्ये ACE2 प्रोटीनच्या कॉपी असतात, ज्या सेल पृष्ठभागावर आढळतात. विषाणू पेशींना संक्रमित करतो, परंतु अलीकडील प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, जेव्हा विषाणूचे कण च्युइंगमच्या ACE2 ला जोडतात तेव्हा विषाणूचा भार कमी राहतो. या च्युइंग गम असलेल्या नमुन्यांची तपासणी केली असता, त्यातील विषाणूजन्य भार 95 टक्के इतका कमी होता.

नेहमीच्या च्युइंगमसारखी चव

युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या रिसर्च टीमच्या मॉलिक्युलर थेरपीच्या अहवालानुसार, तुम्हाला या च्युइंगमची चव सामान्य च्युइंगमसारखीच वाटेल. संशोधकांच्या मते, तुम्ही ते सामान्य तापमानात जास्त काळ साठवून ठेवू शकता आणि ते चघळल्याने ACE2 प्रोटीन रेणूंना नुकसान होत नाही.

हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक

त्याच्या वापरामुळे लाळेतील विषाणूजन्य भार कमी होतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की लसीसह त्याचा वापर केल्याने तुम्हाला फायदा होईल आणि हे च्युइंगम त्या देशांसाठी देखील आहे जेथे अद्याप लस उपलब्ध नाही किंवा परवडणारी नाही.

हे वाचा - मेहुण्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला के.एल.राहुल; ‘तडप’ च्या स्क्रीनिंगमध्ये अथियासोबत दिल्या पोज

हे च्युइंग गम अद्याप सामान्य वापरासाठी उपलब्ध नसले तरी संसर्ग झालेल्या लोकांकडून विषाणूचा प्रसार होण्यापासून बचाव होतो, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. या प्रायोगिक च्युइंगममध्ये असलेले प्रोटीन कोरोना विषाणूच्या कणांना अडकवते आणि लाळेतील विषाणूचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus