पाठीला मसाज करायची ही रीत पाहून बसेल धक्का! चक्क सापांना सोडतात पाठीवर, पाहा VIDEO

चित्रविचित्र प्रकार करून शरीरातील ताण घालवण्याचे अनेक प्रकार इंटरनेटवर बघायला मिळतात. असाच एक मसाज व्हीडिओ पाहून तुम्ही नक्की दचकाल. Snake Massage चा VIDEO व्हायरल होत आहे.

चित्रविचित्र प्रकार करून शरीरातील ताण घालवण्याचे अनेक प्रकार इंटरनेटवर बघायला मिळतात. असाच एक मसाज व्हीडिओ पाहून तुम्ही नक्की दचकाल. Snake Massage चा VIDEO व्हायरल होत आहे.

  • Share this:
    काहिरा (इजिप्त ), 29 डिसेंबर : आजचं युग हे ताणतणावाचं युग म्हणून ओळखलं जातं. ताण आणि सततच्या धावपळीनं येणारा थकवा घालवायचा असेल, तर मसाजसारखा (body massage) दुसरा उपाय नाही. बाजारात आजघडीला बजेटमध्ये बसणारे विविध प्रकारचे स्पा (spa) आहेत. इथं विविध साहित्य आणि सुगंध वापरून तुमच्या शरीराला रिलॅक्स केलं जातं. मात्र तुम्ही कधी सापांच्या मसाजबाबत (snake massage) ऐकलंय? इजिप्तमध्ये (egypt) मात्र ताण घालवण्यासाठी करण्याचा मसाज चक्क सापांच्या माध्यमातून केल्याचं समोर आलं आहे. इजिप्तमध्ये एक कैरो स्पा (Cairo spa) आहे. इथे लोकांची रांग लागते ती स्नेक मसाज घेण्यासाठी! तुम्ही हे वाचूनच घाबरला असाल, मात्र स्पाचे मालक काही वेगळंच सांगत आहेत. मालक सफवत सेदकी म्हणतात, "स्नेक मसाज मांसपेशी आणि सांध्यांचं दुखणं कमी करण्यासाठी खूप फायद्याचा असतो. सोबतच रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी हा मसाज मदत करतो. स्पामध्ये क्लायंट म्हणून आलेल्या दिया झेन यांनी सांगितलं, "मला या मसाजबाबत इंटरनेटवर वाचायला मिळालं. मी हा मसाज ट्राय करायला इकडं आलो. सापांना माझ्या पाठीवर सोडलं गेलं तेव्हा मला मस्त निवांतपणाचं फिलिंग आलं. आराम मिळाला. आधी मी घाबरलो होतो. पण साप माझ्या पाठीवर फिरू लागले तेव्हा भिती कुठल्याकुठं पळून गेली आणि एकदम छान, तणावमुक्त वाटायला लागलं." मसाजची ही कल्पना अनेक लोकांना आवडली नाही असं त्यांच्या ट्विटरवरच्या (twitter) प्रतिक्रियांवरून वाटतं. बहुतेकांना हा पैशाचा अपव्यय वाटतो आहे. तर काहींचं म्हणणं आहे, की यामाध्यमातून माणसानं सापांना त्रास देण्याचा आणखी एक मार्ग शोधून काढला आहे. काही लोक यातही असे आहे ज्यांना हा प्रकार ट्राय करून पहायला आवडणार आहे. तुम्हाला काय वाटतं स्नेक मसाज करून बघण्याबाबत?
    Published by:News18 Desk
    First published: