ऑफ सीझनमध्ये फिरण्यासाठी भन्नाट पर्याय, कामाच्या व्यापातून एक सुट्टी तर घ्याच!

ऑफ सीझनमध्ये फिरण्यासाठी भन्नाट पर्याय, कामाच्या व्यापातून एक सुट्टी तर घ्याच!

फिरण्याची आवड असणाऱ्यांना फक्त प्लॅनिंग, वेळ आणि पैशांची गरज असते. सप्टेंबर महिन्यात फिरण्यासाठी या जागेपेक्षा सर्वोत्तम जागा तुम्हाला भारतात कुठेच मिळणार नाही.

  • Share this:

जर तुम्हाला फिरायला आवडतं तर कुठे जायचं याचा आता फार विचार करू नका. कारण फिरण्याची आवड असणाऱ्यांना फक्त प्लॅनिंग, वेळ आणि पैशांची गरज असते. आतापर्यंत तुम्ही कुठे फिरायला गेला नसाल तर ऑफ सीझनमध्ये स्वस्त आणि अविस्मरणीय सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही धबधब्याचा आवाज आणि दूर समुद्रावर होणारा सूर्यास्त पाहून तुमचा क्षणार्धात मूड बदलू शकतो. धकाधकीच्या जीवनातून तुम्ही हव्या हव्याशा शांततेच्या ठिकाणी गेल्याचं तुम्हाला लगेच वाटू शकतं. सप्टेंबर महिन्यात फिरण्यासाठी या जागेपेक्षा सर्वोत्तम जागा तुम्हाला भारतात कुठेच मिळणार नाही. ही जागा म्हणजे दक्षिण भारतातील केरळ.

इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात केरळला जाणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ऑफ सीजनमध्ये केरळला जाणारा विमान प्रवास हा इतर ऋतूंच्या मानाने फार स्वस्त असतो. अशात तुम्ही कमी बजेटमध्ये केरळमध्ये फिरायला जाण्याची संधी सोडू शकत नाही. विमान प्रवासाशिवाय पावसाळ्यात केरळमधील पंचतारांकीत हॉटेलही 40 ते 50 टक्के सूट देतात.

पावसाळ्यात एक वेगळं केरळ पाहायला मिळतं. अशात तुम्ही तुमच्या पार्टनर किंवा कुटुंबासोबत केरळला जाण्याची संधी सोडू नका. इथे पोहोचल्यावर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत तुमचा वेळ कसा निघून ते तुम्हालाच कळणार नाही. निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या ठिकाणी फिरताना, हाउसबोटमध्ये राहण्याचा अॅडव्हेंचर अॅक्टिविटी करण्याचा फायदा तुम्ही ऑफ सीझनमध्ये जास्त चांगल्याप्रकारे घेऊ शकता. कारण यावेळी लोकांची फारशी गर्दीही नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सूट मिळते.

केरळमधील आयुर्वेदिक उपचार हे जगभरात प्रसिद्ध आहेत. या दौऱ्यात तुम्ही या उपचारांचाही अनुभव घेऊ शकता. तुम्हाला बॉडी किंवा हेड मसाज करायचा असेल तर ऑफ सीझनमध्ये केरळला जाणं केव्हाही चांगलं. यावेळी ट्रीटमेंटच्या किंमतीही कमी असतात.

केरळमधील बॅकवॉटरची स्थळं ही जगभरात प्रसिद्ध आहेत. मोठ्या नावेतून बॅकवॉटरचा प्रवास करण्याचा अनुभव तुम्हीही कधीच विसरू शकणार नाही. आलप्पुझा या ठिकाणाला पूर्वेचं वेनिस असं म्हटलं जातं. हे ठिकाण हाउसबोट नौका विहारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य काय असतं याची नवी व्याख्या दिसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या