Home /News /lifestyle /

घराच्या आवारात लावा ही झाडं; मच्छर होतील छुमंतर

घराच्या आवारात लावा ही झाडं; मच्छर होतील छुमंतर

या झाडांच्या (plants) वासामुळे मच्छर (mosquitoes) दूर पळून जातात.

    मुंबई, 24 जून : पावसाळा (monsoon) सुरू झालं की सर्वात जास्त त्रास होतो तो मच्छरांचा(Mosquitoes). डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो. घरात मच्छर होणार नाहीत यासाठी घरात किंवा घराच्या आसपास अस्वच्छता राहणार नाही, पाणी साचणार नाही याची काळजी घेतो आणि मच्छर झाले असतील तर त्यांच्यापासून आपला बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, मच्छर पळवणारी अगरबत्ती आणि क्रिम्स आपण वापरतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या आवारात काही झाडं ((Plants) लावल्यानेही तुम्हाला मच्छरांपासून सुटका मिळेल. अशी झाडं आहेत, ज्यांच्यामुळे डास दूर पळतात. या झाडांच्या सुगंधांमुळे डास त्याठिकाणी फिरतही नाहीत. तुळस आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात तुळस असतेच. तुळस वातावरण तर शुद्ध ठेवतेच शिवाय मच्छरांपासूनही मुक्ती देते. तुळशीचा वापर करून असे सुगंधी तेल तयार केले जातात ज्यामुळे डास आणि माशांना दूर ठेवता येतं. त्यामुळे घराच्या बाहेर किंवा खिडकीत तुळस ठेवल्यानं त्याच्या वासाने मच्छर दूर पळतील. विशेष म्हणजे मच्छर चावल्यानंतर त्वचा लालसर होते, त्यावेळी त्या ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस लावल्यानेही फायदा होतो. सिट्रोनेला मॉस्किटो रेप्लिएंट क्रिममध्ये या झाडाच्या पानांचा वापर केला जातो. मच्छरांपासून बचाव करण्यासाठी हे झाड खूप परिणामकारक आहे. याच्या वासामुळे मच्छर दूर पळतात. या झाडाच्या पानांचा रस काढून त्वचेवर लावल्यास मच्छर आपल्या जवळ अजिबात येणार नाहीत. पुदीना पुदिन्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याच्या वासामुळेही मच्छर दूर राहतात आपल्याजवळ येत नाहीत. गोंड्याच्या फुलाचं झाड या झाडात पायरेथ्रम नावाचं असा घटक असतो, ज्यामुळे मच्छर त्याच्या आसपासही येत नाही. या झाडाचा वासानेच मच्छर दूर राहतात. तुमची बाग असल्यास त्या बाहेत हे झाड लावा. लेमन बाम हे झाड घराच्या सजावटीत वापरलं जातं. या झाडाच्या फुलांचा गंध खूप तीव्र असतो, ज्यामुळे मच्छर पळतात. हे झाड उन्हात ठेवू नका. एग्रेटम प्लांट हेदेखील एक चांगलं मॉस्किटो रेप्लिएंट आहे. या झाडातून येणारा वासही इतका तीव्र असतो की मच्छर घरात येणारच नाहीत. मॉस्किटो रेप्लिएंट आणि परफ्युम तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही आता मच्छरांपासून हैराण झाला असाल तर ही झाडं नक्की लावून पाहा. संकलन, संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Monsoon, Mosquitoes

    पुढील बातम्या