या पठ्ठ्यानं 28 व्या वर्षी दोन इंचाने वाढवली उंची, लहानपणापासूनचं होतं स्वप्न

या पठ्ठ्यानं 28 व्या वर्षी दोन इंचाने वाढवली उंची, लहानपणापासूनचं होतं स्वप्न

उंची ही खरंतर निसर्गानं दिलेली गोष्ट. त्यात एका विशिष्ट वयानंतर बदल शक्य नसतो. या व्यक्तीनं मात्र आधुनिक विज्ञानाची मदत घेत जणू चमत्कारच केला आहे.

  • Share this:

टेक्सास, 20 जानेवारी : तुम्हाला नेहमीच आत्ता आहात त्याहून उंच असावं असं वाटत असतं का? तुमचा टीनएज अर्थात पौगंडावस्थेमध्ये (teenage) तुम्हाला असं वाटलं का, की आपण वीस वर्षांचे होईपर्यंत 6 फूट उंच झालं पाहिजे? खरंतर जगात असे खूप लोक आहेत ज्यांना ते आता आहेत त्याहून उंच असावं असं वाटतं.

अल्फोन्सो फ्लोरेस या टेक्सासच्या डल्लास शहरामधील (Dallas) व्यक्तीनं मात्र वयाच्या 28व्या वर्षी आपली उंची (height) वाढवण्याचा पर्यायी मार्ग यशस्वीपणे शोधला आहे. फ्लोरेसला तो लहान असल्यापासून कायमच उंच व्हायचं होतं. त्याच्या आयडॉल (idol) असलेल्या व्यक्ती अर्थात मिशेल जॉर्डन, कोबे ब्रायंट आणि फील जॅक्सन यांच्याप्रमाणं. लिम्बप्लास्ट एक्स इन्स्टिट्यूटच्या डॉ. केविन देबीप्रशाद यांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर फ्लोरेन्स आता सहा फूट उंच झाला आहे. Times now ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हे झालं कसं, तर फ्लोरेसनं लिम्ब लेंथनिग सर्जरी (limb lengthening surgery) करवून घेतली. तो 5 फूट 11 इंचांपासून 6 फूट 1 इंचापर्यंत उंच झाला. फ्लोरेस  म्हणतो, की माझी पूर्वीची उंची मस्तच होती पण मला मी 12 वर्षांचा असल्यापासूनच 6 फूट उंच व्हायचं होतं. या उंचीसाठी मी आग्रही होतो कारण मला माझी ऍथलेटिक क्षमता जास्तीत जास्त वापरायची होती. आणि आता ते शक्य होत असल्याचं मी अनुभवू शकतो.

सर्जरीनंतर लगोलग फ्लोरेसनं आपल्या नव्या उंचीशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. आणि आता त्याला वाढलेली नवी उंची एकदम सवयीची झाली आहे. फ्लोरेस सांगतो, त्याचे कुटुंबीय आणि मित्र या शस्त्रक्रियेबाबत अजिबातच स्वागतार्ह नव्हते. त्यांनी फ्लोरेसला या निर्णयापासून सतत परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र फ्लोरेसनं त्यांना ही प्रक्रिया सुरक्षित असल्याचं अगदी संयमानं समजावून सांगितलं. त्यानंतर या लोकांनी फ्लोरेसला पाठिंबा द्यायला सुरवात केली.

डॉ. देबीप्रशाद सांगतात त्याप्रमाणे या लिम्ब लेंथनिग सर्जरीमध्ये पायाच्या हाडांना कापून त्यात एक डिव्हाईस बसवलं जातं. हे डिव्हाइस हळूहळू लांबत जातं, ज्यामाध्यमातून व्यक्तीची उंची हळूहळू वाढत जाते.

Published by: News18 Desk
First published: January 20, 2021, 9:08 PM IST

ताज्या बातम्या