OMG VIDEO : ही चित्रं त्यांनी ब्रशने नव्हे तर जिभेने काढली आहेत!

OMG VIDEO : ही चित्रं त्यांनी ब्रशने नव्हे तर जिभेने काढली आहेत!

केरळमधल्या करुणागपल्लीचे अनिवर्नम यांनी जिभेने चित्रं काढण्याचा विक्रम केला आहे. ते हाताने तर चित्रं काढतातच पण जीभ, हनुवटी आणि पायानेही चित्रांत रंग भरतात. तुम्ही त्यांना अशी चित्रं काढताना पाहिलंत तर थक्क व्हाल. त्यांची जीभ हाच त्यांचा ब्रश आहे !

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : तुम्ही जिभेचा वापर कशासाठी करता ? तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला ! उत्तर सोपं आहे. जिभेमुळे पदार्थांची चव कळते. हल्ली तर सेल्फी काढताना जिभेचा वापर करणं हेही 'क्यूट' मानलं जातं. पण केरळमध्ये असा एक अवलिया आहे जो जिभेने चित्रं काढतो!

केरळमधल्या करुणागपल्लीचे अनिवर्नम यांनी जिभेने चित्रं काढण्याचा विक्रम केला आहे. ते हाताने तर चित्रं काढतातच पण जीभ, हनुवटी आणि पायानेही चित्रांत रंग भरतात. तुम्ही त्यांना अशी चित्रं काढताना पाहिलंत तर थक्क व्हाल. ते यात ब्रश वापरतच नाहीत. त्यांची जीभ हाच त्यांचा ब्रश आहे ! कधीकधी तर ते एखाद्या छोट्याशा जागेत नाकानेही रंग भरतात.

कशी सुचली ही आयडिया ?

अनिवर्नम हे काही अपंग नाहीत. मग ही जिभेने चित्रं काढण्याची आयडिया त्यांना सुचली कशी? ते सांगतात, मी एकदा मंजु नावाच्या एका अपंग मुलीला चित्रकला शिकवत होतो. तेव्हा जिभेने चित्रं काढली तर ती कशी होतील? असं माझ्या मनात आलं.

2006 पासून अनिवर्नम यांनी अशी चित्रं काढायला सुरुवात केली आणि आता त्यांनी एक हजारपेक्षाही जास्त चित्रं काढली आहेत. अशी चित्रं काढणारे ते भारतातले पहिले कलाकार आहेत.

चांगले रस्ते हवे असतील तर आयुष्यभर टोल द्या, नितीन गडकरींचं वक्तव्य

अनिवर्नम करुणागपल्लीच्या एका शाळेत मुलांना चित्रकला शिकवतात आणि ज्यांना त्यांच्यासारखी चित्रं काढायची आहेत त्यांना ते घरीही शिकवतात. हाताच्या कोपराने चित्रं काढण्याची त्यांची कला आता त्यांच्या विद्यार्थ्यांनाही अवगत झाली आहे.

कोणत्याही बाबतीतली जिद्द, चिकाटी आणि हार न पत्करणं यामुळे आपण हा विक्रम करू शकलो, असं अनिवर्नम सांगतात. त्यांची ही चित्रं पाहून ही चित्रं त्यांनी जिभेने काढली आहेत यावर आपला विश्वासच बसत नाही.

यातली रंगसंगती, आकार हे तर हाताने काढलेल्या चित्रांपेक्षाही नाजूक आणि रेखीव आहेत. अशी चित्रं काढण्यातला आनंद आता ते त्यांच्या विद्यार्थ्यांनाही वाटत आहेत. रंगांचे आणि रेषांचे ते अद्भूत जादूगार आहेत.

==========================================================================================

मृत्यू तिच्या लेकरांना हातही लावू शकला नाही, कारण समोर उभी होती आई!

First published: July 16, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading