डासांपासून होणाऱ्या या आजाराचा विषाणू पसरतो सेक्समुळे

डासांपासून होणाऱ्या या आजाराचा विषाणू पसरतो सेक्समुळे

भारतात गेल्या वर्षी हा भयंकर विषाणू पहिल्यांदा सापडला. डेंग्यूचा आजार पसरवणाऱ्या डासांमुळेच या व्हायरसचं संक्रमण होतं.

  • Share this:

मुंबई : भारतात गेल्या वर्षी हा भयंकर विषाणू पहिल्यांदा सापडला. राजस्थानमध्ये एका स्त्रीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं सप्टेंबर 2018 मध्ये लक्षात आलं. झिका व्हायरस हा जीवघेणा असू शकतो. आफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशांमध्ये हा आजार पसरायला लागला आहे. या आजारापासून वाचायचं असेल तर डासांपासून दूर राहायला हवं.

झिका व्हायरस एडिस इजिप्ती या डासामुळेच पसरतो. हाच डास डेंग्यू पसरवण्यासाठी कारणीभूत असतो. एडिस इजिप्ती हा डास दिवसा चावतो आणि स्वच्छ पाण्यातही या डासाची मादी अंडी घालते. डास चावू नयेत, घरात येऊच नयेत म्हणून काळजा घ्यायला हवी. साचलेल्या पाण्यात डेंग्युच्या डासाच्या अळ्या होतात. स्वच्छ पाण्यातही या डासांची मादी अंडी घालते. त्यामुळे फार दिवस पाणी भरून ठेवणं योग्य नाही. पाण्यावर झाकण ठेवणंही आवश्यक आहे. हाच डास झिका व्हायरस पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतो.

हे वाचा - डेंग्यू- मलेरिया झाला तर हे फळ आणि पानं ठरतील संजीवनी

झिका व्हायरसचा प्रसार शरीरसंबंधातूनही होतो, असं नुकतंच सिद्ध झालं आहे. एप्रिल 2016 मध्ये झालेल्या संशोधनात झिका व्हायरसचं संक्रमण स्त्री-पुरुष सेक्स पार्टनर्समध्ये झाल्याचं दिसलं. चिली, फ्रान्स, इटली, न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि अमेरिका या देशांमध्ये सेक्समुळे पसरलेल्या झिका व्हायरसचे रुग्ण दिसले.

हेही वाचा - डासांना पळवायचंय? हे 6 उपाय करून पाहा

आफ्रिकेतून या विषाणूचं मानवामध्ये संक्रमण झाल्याचं सांगतात. सुरुवातीला डासांमुळे याचा फैलाव झाला.

----------------------------------------------------------

VIDEO: निवडणुकीवरून भररस्त्यात मुलींमध्ये तुफान राडा

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 26, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading