या अॅपने आता घर बसल्या घ्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात Appointment

या अॅपने आता घर बसल्या घ्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात Appointment

मोबाइलमधले अनेक अॅप हे यूझरच्या गरजा पाहून तयार करण्यात येतात. पण, आपल्यापैकी फार कमी लोकांना या अॅपबद्दल माहिती असते.

  • Share this:

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपलं जीवन अधिक सुकर केलंय. सगळ्यांचंच आयुष्या हे या सर्व तंत्रज्ञानावर आणि विज्ञानाच्या आविष्कारावर अवलंबून आहे. यातही मोबाइल फोनवर अवलंबून राहण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मोबाइलमधले अनेक अॅप हे यूझरच्या गरजा पाहून तयार करण्यात येतात. पण, आपल्यापैकी फार कमी लोकांना या अॅपबद्दल माहिती असते. सर्व सामान्य जनतेच्या उपयोगाला येतील असे अनेक अॅप सरकारने तयार केले आहेत. अशाच काही अॅपबद्दल जाणून घेऊ...

ई- हॉस्पिटल (e-hospital)

नावावरूनच अनेकांना कळेल की हे रुग्णालयाशी निगडीत अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सरकारी रुग्णालयांची यादी मिळते. तुम्ही या अॅपच्या माध्यमातून डॉक्टरांची अपॉइंटमेन्ट घेऊ शकता.

112 इंडिया- 112 India

हा एक इमरजन्सी मोबाइल अॅप आहे. याची सुरुवात काही वर्षांपूर्वी राजनाथ सिंह यांनी केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी हा अॅप तयार करण्यात आला होता. या अॅपमध्ये 'शाउट' हे एक विशेष फिचर आहे, जे खास महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलं आहे. महिला असुरक्षित असतील तर त्यांना देशभरात कुठेही तत्काळ पोलिसांची किंवा वॉलेंटिअरची मदत मिळेल. हे अॅप अडचणीत सापडलेल्या महिलांना जीपीएसच्या मदतीने ट्रॅक करण्यात सक्षम आहे.

फॉलो मी अॅप-

जीपीएस ट्रॅकिंगसाठी हे अॅप उपयोगी येतं. या अॅपच्या युझरच्या लाइव्ह लोकेशनबद्दल कळतं, याच्या मदतीने तुम्ही कोणालाही तुमचं लाइव्ह लोकेशन पाठवू शकता. याशिवाय जेव्हा तुम्ही घरी सुरक्षित पोहोचता तेव्हा हे अॅप तुमच्या पालकांना त्याची कल्पना देतं. व्हॉट्सअपनेही याच्याशी मिळतं- जुळतं फिचर काही महिन्यांपूर्वी सुरू केलं आहे.

ऑल कॅब अॅप-

आता कॅबच्या एवढ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत की प्रत्येक कंपनीचे अॅप डाउनलोड केले तर फोनची मेमरीच भरून जाईल. अशावेळी ऑल कॅब अॅप सर्वांसाठी उपयुक्त आहे. या अॅपच्या मदतीने सर्व टॅक्सी सर्विसिंग अॅप एकत्र दिसतात.

लोकल पोलीस अॅप-

हा एक महत्त्वपूर्ण अॅप आहे. लोकल पोलीस अॅपच्या माध्यमातून न्यायव्यवस्था आणि सार्वजनिक सेवांचा उपभोग घर बसल्या घेता येऊ शकतो. हा अॅप लोकांना त्यांच्या लोकल पोलिसांशी जोडण्याचं काम करतो. यामुळे स्मार्टफोनच्या मदतीने ते पोलिसांची मदत घेऊ शकतात.

रात्री चांगली झोप घेण्यात भारतीय अव्वल- आंतरराष्ट्रीय सर्व्हे

Parle G कंपनीत काम करणाऱ्या 10 हजार लोकांची जाऊ शकते नोकरी, काय आहे पूर्ण प्रकरण

Period च्या दुखण्याला आता या तेलामुळे मिळेल आराम, एकदा वापरून पाहा!

लसूण सोलण्याचा हा व्हिडिओ होतोय VIRAL, आतापर्यंत 1 अब्ज लोकांनी पाहिला

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 21, 2019, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading