मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या माणसानं केलीत तब्बल 27 लग्नं, आहेत 150 मुलं, आता TikTok मुळे झालाय प्रचंड लोकप्रिय

या माणसानं केलीत तब्बल 27 लग्नं, आहेत 150 मुलं, आता TikTok मुळे झालाय प्रचंड लोकप्रिय

जगात अनेक लोक जगताना अनेक प्रयोग करत असतात. या माणसांनं लग्न आणि कुटुंबाच्याबाबतीत असाच अचाट प्रयोग केला आहे.

जगात अनेक लोक जगताना अनेक प्रयोग करत असतात. या माणसांनं लग्न आणि कुटुंबाच्याबाबतीत असाच अचाट प्रयोग केला आहे.

जगात अनेक लोक जगताना अनेक प्रयोग करत असतात. या माणसांनं लग्न आणि कुटुंबाच्याबाबतीत असाच अचाट प्रयोग केला आहे.

कोलंबिया, 21 जानेवारी : भारतीय संस्कृतीत (Indian culture) एकपत्नी असण्याची महती नेहमीच सांगितली जाते. मात्र विदेशात एक बहुपत्नीत्वाची जीवनशैली अंगिकारणारा माणूस जगभरातल्या लोकांच्या कुतूहलाचा विषय बनतो आहे. शिवाय त्यानं जबरदस्त फॅन फॉलोईंगही (fan following) मिळवलं आहे.

64 वर्षांचे विन्स्टन ब्लॅकमोर हे कॅनडाचे (Canada) सर्वात प्रसिद्ध बहुपत्नीवादी (polygamist) आहेत. ब्रिटिश कोलंबियामध्ये राहणाऱ्या विन्स्टनला तब्बल 150 मुलं आहेत. याशिवाय त्यांच्या 27 बायका होत्या. त्यातील आता 22 जणी हयात आहेत.

या विन्स्टन यांचा 19 वर्षांचा मुलगा मर्लिन ब्लॅकमोर हा आपल्या प्रचंड विस्तारलेल्या कुटुंबाबाबत अनेक गोष्टी सोशल मीडियावर (Social media) शेअर करतो आहे. या गोष्टी लोकांना खूप आवडत आहेत. शिवाय टिकटॉकवर (Tik-tok) मार्लिनची फॅन फॉलोईंगसुद्धा (fan following) खूप वाढते आहे.

टिकटॉकवर मर्लिनव्यतिरिक्त त्याचा 21 वर्षांचा भाऊ (brother) वॉरेन आणि 19 वर्षांचा सावत्र भाऊ मरी हासुद्धा विविध गोष्टी शेअर करत असतो. या तिन्ही भावांनी आता ब्रिटीश कोलंबियाचं बाऊंटीफुल शहर सोडलं आहे. या तिघांनाही असा विश्वास वाटतो, की यांची येणारी पिढी एखाद्या घट्ट कुटुंबासारखी (Family) एकमेकांसह बांधलेली असेल. वॉरेनसुद्धा टिकटॉक अकाउंटवर आपल्या कुटुंबाबतच्या रंजक गोष्टी टाकत असतो.

मर्लिन सध्या अमेरिकेत राहतात. ते एका व्हीडिओत म्हणतात, की त्यांच्या सात सख्ख्या भाऊ-बहिणी आहेत. त्यांच्या एका सावत्र बहिणीसह एका सावत्र भावाचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. ते आणि त्यांच्या भावांमध्ये वयाचं मोठंच अंतर आहे. मर्लिनचा सर्वात मोठा भाऊ 44 वर्षांचा आहे. आणि सर्वात लहान भाऊ केवळ 1 वर्षांचा.

वॉरेन टिकटॉकवर आपल्या कुटुंबाबाबतच्या गोष्टी शेअर करतो. एका व्हीडिओमध्ये तो सांगतो, की त्याच्या वर्गात 19 विद्यार्थी होते. आणि ते सगळे 1999 मध्ये जन्मलेले होते. विशेष म्हणजे या वर्गातले सर्वचजण त्यांचे भाऊ बहीण आणि नात्यातले असणारे असे होते. ही शाळा वॉरेनच्या वडिलांची होती. वॉरेन बहुतेकदा आपलं अन्न स्वतः पिकवतो.

First published:
top videos

    Tags: Tiktok viral video, United States of America