मुंबई, 20 डिसेंबर: इंटरनेटवरचा (Internet) युट्युब (you tube) प्लॅटफॉर्म जगभरातील असंख्य क्रिएटिव लोकांना प्रकाशात आणतो. अगदी नव्वद वर्षांच्या आजीपासून ते शाळकरी मुलापर्यंत सगळे युट्युबर चढाओढीनं आपला हुनर सादर करत लाखोनं व्ह्युज मिळवताना दिसतात. 2020 साल गाजवलं ते अशाच एका 9 वर्षांच्या युट्युबरनं. रेयान काजी त्याचं नाव. 12 अब्ज Views आणि 41.7 दशलक्ष सबस्क्रायबर्स असलेलं त्याचं अकाऊंट म्हणजे Ryan's world.
"रेयानच्या जगात तुमचं स्वागत आहे. रेयानला खूप साऱ्या गंमतीच्या गोष्टी करायला आवडतात. जसं की, प्रीटेंड प्ले, विज्ञानाचे प्रयोग, म्युजिक व्हिडीओज, स्किट्स, डाय आर्ट, क्राफ्ट आणि अजून खूप काय-काय...!" हे आहे त्याच्या चॅनलवर गेलं की सापडणारं वर्णन. रेयान तसा आहे पिटुकलाच, पण त्याचं हे चॅनल चालवणं हा काही पोरखेळ नाही...
'फोर्ब्स'नं (Forbes') प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, 9 वर्षांचा रेयान2020 मधला सर्वाधिक कमाई करणारा युट्युबर ठरलाय. किती आहे त्याची कमाई? 29.5 अब्ज डॉलर्स! भारतीय रुपयाच्या हिशोबात सांगायचं झालं, तर तब्बल 220 करोड. प्यु डी पाय, मि. बीस्ट असे दिग्गज युट्युबर्सही त्याच्यापुढे फिके पडलेत. या अहवालानुसार, या यादीत सलग तिसऱ्यांदा रेयाननं पहिलं स्थान पटकावलं आहे.
(हे वाचा-'हा' आहे जगातील सर्वात Handsome Maths Teacher, अनेकांना लाजवेल अशी आहे बॉडी)
2015 साली रेयाननं स्वत:चं चॅनल लॉन्च केलं. नवी खेळणी बॉक्समधून काढत आपल्या खास शैलीत रेयान त्यांचा रिव्यू देतो. त्याच्या ब्रॅन्डचे आता खेळणे, बॅकपॅक्स, टुथपेस्ट असं किती कायकाय विकायलाही असतं. रेयान्स मिस्ट्री प्लेडेट नावाची निकलोडियन सिरीजही कमालीची लोकप्रिय आहे. कार, ट्रेन्स, लिगोज अशा अनेक प्रकारच्या खेळण्यांचे मजेदार रिव्युज रेयान करतो. कॅमेऱ्यासमोर हे करताना त्याचा आत्मविश्वास उठून दिसणारा असतो.
(हे वाचा-वयाच्या 50 शी नंतर आहाराची घ्या विशेष काळजी, 'या' 6 सुपरफूड्सचा समावेश करा)
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रेयानसारख्या असंख्य युट्युबर्सनी जगभारातल्या लोकांना आनंद देत आपलं मोल अजूनच ठळक केलं आहे.