Home /News /lifestyle /

Hair Care Tips: हेअर मसाज करण्याची 'ही' आहे योग्य पद्धत, ऋजुता दिवेकर यांनी शेअर केलं सीक्रेट

Hair Care Tips: हेअर मसाज करण्याची 'ही' आहे योग्य पद्धत, ऋजुता दिवेकर यांनी शेअर केलं सीक्रेट

प्रातिनिधिक फोटो (Photo: shutterstock)

प्रातिनिधिक फोटो (Photo: shutterstock)

Hair Care Tips: जर तुम्हालाही थंडीच्या दिवसांत सुंदर आणि तजेलदार केस हवे असतील तर केसांना मसाज करायला विसरू नका.

    मुंबई, 29 डिसेंबर : महिलांना लांब केस वाढवण्याची इच्छा असते. अनेकजणी ते वाढवतातही पण केस लांब असले की त्यांची निगा राखावी लागते. त्यांना तेल लावणं, ते स्वच्छ धुणं, वेणी घालणं सगळंच करावं लागतं. थंडीच्या दिवसांत केस लवकर खराब होत नाहीत. पण केसांची काळजी (Hair Care) मात्र जास्त घ्यावी लागते. कारण हवेतील गारव्यामुळे केस रूक्ष (Dry Hair) होतात. त्यामुळे केस तजेलदार दिसण्यासाठी तुम्ही मस्तपैकी केसांची चंपी किंवा हेअर मसाजचा (Massage For Hair Care) पर्याय नक्की करून पाहू शकता. ज्यामुळे थंडीतही केस चमकदार आणि सुंदर दिसतील. पण हा मसाजही योग्य पद्धतीने करता यायला हवा. केसांना मसाज म्हणजेच चंपी किंवा मालिश करणं हे काही नवीन नाही. लहानपणी आजीने केसांना मस्तपैकी चंपी केल्याची आठवण आपल्यापैकी अनेकांच्या मनांत असेलच. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत ते मागे पडलं. पण आता थंडीच्या दिवसांत आवर्जून हेअर मसाज केलाच पाहिजे. तसंच केसांना योग्य पद्धतीने मसाज न केल्यास केसगळती (Hairfall) होते. त्यामुळे केसांच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्लाही फॉलो करणं आवश्यक आहे. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांचे अनेक व्हिडीओज तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच. त्यांच्या व्हिडीओमधील माहिती ही नेहमी सोपी आणि त्या त्या ऋतूंमानाला धरून असते. नुकतंच ऋजुता यांनी थंडीत केसांची काळजी कशी घ्यावी आणि केसांना योग्यप्रकारे मालिश करण्याची पद्धत सांगणारा व्हिडीओही शेअर केला आहे. वाचा : बायको पळाली! शोधणाऱ्याला मिळणार 5 हजार रुपये; नवऱ्याने दिली ऑफर केसांना योग्य मसाज (How To Massage Hair Properly) करण्यासाठी सर्वांत आधी हातावर थोडसं नारळाचं तेल (Coconut Oil) घेऊन केसांच्या मुळांशी हळूवार लावलं पाहिजे. मग पुन्हा थोडसं तेल हातावर घ्या आणि बोटांच्या मदतीने हळूहळू मसाज करा. त्यानंतर कपाळाला आणि कानांच्या मागे अंगठ्याने किंवा बोटांच्या साहाय्याने गोलाकार मसाज करा. नंतर पुन्हा थोडं तेल घेऊन मानेपासून सुरूवात करून केसांच्या वरच्या टोकापर्यंत मसाज करा. यामुळे तुम्हाला अगदी छान वाटेल. वर सांगितलेल्या पद्धतीने केसांना मसाज केल्यास केसांचं पोषण तर होतंच. तसंच त्वचेची छिद्रं मोकळी होऊन डोक्यातलं रक्ताभिसरणही चांगल होतं. परिणामी कोंडा, अकाली केस पांढरे होणं, केसांचा कोरडेपणा, डोकेदुखी आणि तणाव यासारख्या समस्या दूर होतात. केसांचा मसाज केल्याने तुम्हाला छान आणि रिलॅक्स वाटतं. रोज झोपण्याआधी केसांना तेलाने मसाज केल्यास झोपही चांगली लागते. तेच तेल तुम्ही पायांच्या तळव्यांना लावून ते चोळू शकता. त्याचाही उपयोग शांत झोप लागण्यासाठी होतो. जर तुम्हालाही थंडीच्या दिवसांत सुंदर आणि तजेलदार केस हवे असतील तर केसांना मसाज करायला विसरू नका.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Woman hair

    पुढील बातम्या