Home /News /lifestyle /

Winter skin care: थंडीमध्ये त्वचेसाठी जबरदस्त आहे हे होममेड सीरम; अनेक महागडी प्रॉडक्ट पडतील फेल

Winter skin care: थंडीमध्ये त्वचेसाठी जबरदस्त आहे हे होममेड सीरम; अनेक महागडी प्रॉडक्ट पडतील फेल

हे सीरम त्वचेला आतून ओलावा देतं आणि कोरडेपणा दूर करते. ते रोज लावल्यानं त्वचा मऊ, स्वच्छ, चमकदार बनते. हे एक अतिशय स्वस्त आणि टिकाऊ स्किनकेअर उत्पादन आहे, जे कोणीही सहजपणे वापरू शकतं. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

    मुंबई, 24 डिसेंबर : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा खूप वाढतो. त्यामुळं फुटलेले ओठ, खडबडीत त्वचा यासारख्या समस्या उद्भवतात. हे बरं करण्यासाठी लोक महागडी उत्पादनं, प्रसाधनं वापरतात. परंतु, त्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. थंड वारे वाढले की पुन्हा समस्या वाढू लागतात. अशा परिस्थितीत घरी तयार केलेलं ग्लिसरीन सीरम (Glycerin serum) खूप फायदेशीर (Winter skin care tips) ठरू शकतं. हे ग्लिसरीन सीरम त्वचेला आतून ओलावा देतं आणि कोरडेपणा दूर करते. ते रोज लावल्यानं त्वचा मऊ, स्वच्छ, गोरी आणि चमकदार बनते. हे एक अतिशय स्वस्त आणि टिकाऊ स्किनकेअर उत्पादन आहे, जे कोणीही सहजपणे वापरू शकतं. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. टीव्ही 9 ने यासंबंधी माहिती दिली आहे. तर, ग्लिसरीन सीरम कसं बनवायचं ते जाणून घेऊ. साहित्य 100 मिली ग्लिसरीन, 2 चमचे लिंबाचा रस, 30 ते 40 मिली गुलाब पाणी, व्हिटॅमिन ई तेलाचे 10 थेंब, ग्लिसरीन सीरम ठेवण्यासाठी काचेची बाटली. कसं बनवावं ग्लिसरीन सीरम बनवायला खूप सोपं आहे. यासाठी भांडं घ्या. त्या भांड्यात प्रथम ग्लिसरीन घाला. नंतर गुलाबपाणी घाला. दोन्ही नीट मिसळा. यानंतर लिंबाचा रस आणि व्हिटॅमिन ई तेलाचे थेंब घाला. यानंतर हे मिश्रण काचेच्या बाटलीत ठेवा आणि रात्री वापरा. हे वाचा - Toothache: थंडीत होणाऱ्या दातदुखीमुळं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय लगेच देतील आराम वापरण्याची पद्धत रात्री झोपताना याचा वापर करणं चांगलं आहे. कारण, त्या वेळी त्वचेवर कोणत्याही प्रकारची धूळ जाण्याची भीती नसते. रात्री झोपण्यापूर्वी तोंड किंवा ज्या भागावरील त्वचा फुटली आहे, तो भाग पाण्यानं चांगला धुवा. त्यानंतर हे मिश्रण लावा. रात्रभर राहू द्या. सकाळी पाण्याने तोंड धुवून स्वच्छ करा. हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर जाणून घ्या सीरमचे फायदे यामुळं त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेवरील कोणत्याही प्रकारचे डागही दूर होतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्याचंही काम हे सीरम करतं. हे सीरम नियमितपणे लावल्यानं त्वचेचा रंग गोरा होतो. त्वचा लहान मुलांसारखी मुलायम आणि चमकदार बनते. हे सीरम वापरण्याव्यतिरिक्त, कोरडेपणा नियंत्रित करण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्यावं. थंड पाणी जास्त प्यावंसं वाटत नसेल तर पाणी किंचितसं कोमट करून प्यावं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Skin, Skin care

    पुढील बातम्या