मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Kidney Stone : मुतखड्याच्या त्रासावर हा घरगुती उपाय आहे फायदेशीर, जाणून घ्या योग्य पद्धत

Kidney Stone : मुतखड्याच्या त्रासावर हा घरगुती उपाय आहे फायदेशीर, जाणून घ्या योग्य पद्धत

Kidney

Kidney

मुतखड्याचा त्रास होत असल्यास थकवा जाणवतो. अशा स्थितीत कोमट पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे पेशींमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट सक्रिय होतात, ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या कमी होतात.

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर : मुतखड्याचा (Kidney Stone) त्रास होत असल्यास आरोग्य तज्ज्ञ अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. मुतखड्याच्या समस्येवर कोमट पाणी पिणं फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, मुतखडा झालेल्या रुग्णांनी दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. जाणून घ्या किडनी स्टोनच्या समस्येत गरम पाणी पिण्याचे (Hot Water) फायदे- थकवा कमी होईल मुतखड्याचा त्रास होत असल्यास थकवा जाणवतो. अशा स्थितीत कोमट पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे पेशींमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट सक्रिय होतात, ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या कमी होतात आणि तुम्ही अ‌ॅक्टीव राहता. पचनाशी संबंधित समस्या मुतखड्याचा त्रास होत असल्यास पोटदुखी (stomach) आणि बद्धकोष्ठतेचीही समस्या जाणवते. अशा स्थितीत दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला फायदा होईल. गरम पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. नियमित गरम पाणी प्यायल्याने अपचन आणि गॅसचा त्रास होत नाही. हे वाचा - लक्षणे दिसण्यापूर्वी कोरोना आहे की नाही सांगेल हे Smartwatch – नवीन संशोधन मुतखड्यामध्ये लघवीचा प्रवाह कमी होतो किंवा थांबतो. शरीरातील पाण्याचा प्रवाह सुधारण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा जास्त पिऊ नका मुतखड्यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवते. यामध्येही गरम पाण्याचे सेवन फायदेशीर ठरेल. गरम पाणी प्यायल्याने पोटदुखीवरही आराम मिळतो, पण लक्षात ठेवा की गरम पाणी जास्त प्रमाणात पिऊ नका. जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास त्रास आणखीन वाढू शकतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Kidney sell

    पुढील बातम्या